Video : पॉपकॉर्न फारच महाग झालेत, शहनाझच्या प्रश्नावर सुनील शेट्टी म्हणतो, 'मी कुठे विकतोय?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:59 IST2023-03-26T14:58:34+5:302023-03-26T14:59:29+5:30
'देसी वाईब्स विथ शहनाझ' या शोमध्ये सुनील शेट्टी आणि शहनाझ गिल यांनी धम्माल आणली.

Video : पॉपकॉर्न फारच महाग झालेत, शहनाझच्या प्रश्नावर सुनील शेट्टी म्हणतो, 'मी कुठे विकतोय?'
बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) अभिनयाचे अनेक चाहते आहेत. सोबतच तो एक माणूस म्हणूनही खूप चांगला आहे अशीच त्याची प्रसिद्धी आहे. 'धडकन', 'हेरा फेरी' सारख्या सिनेमातून त्याने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र सुनील शेट्टी केवळ अभिनय क्षेत्रावरच अवलंबून नाही तर त्याचे इतरही व्यवसाय आहेत. त्यातच शेट्टी म्हणल्यावर त्याचा अर्थातच रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे. सुनील नुकताच अभिनेत्री शहनाझ गिलच्या शो (Shehnaaz Gill) मध्ये आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी महागड्या पॉपकॉर्नवरुन शहनाझने सुनीलला प्रश्न विचारला.
'देसी वाईब्स विथ शहनाझ' या शोमध्ये सुनील शेट्टी आणि शहनाझ गिल यांनी धम्माल आणली. यावेळी शहनाझ म्हणाली, 'मी सिनेमे बघायला थिएटरमध्ये जाते तर १४००-१५०० चे झालेत आजकाल. यावर सुनील म्हणतो, 'पॉपकॉर्न? हो माहितीए मला'. यावर शहनाझ म्हणते, 'इतके महाग का आहेत.' तर सुनील शेट्टी म्हणतो, 'अरे मला कसं माहित असेल मी कुठे विकतोय? माझं काही देणघेणं नाही. कंपनीचं नाव आहे पॉपकॉर्न' सुनीलच्या उत्तरावर एकच हशा पिकतो.
शहनाझने सुनीलची केलेली ही चेष्टा पाहून चाहत्यांनाही मजा आली. पंजाबी गायक गुरु रंधावाने व्हिडिओवर कमेंटही केली. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांशी संवाद साधला. यावेळी जॅकी दादा म्हणजेच जॅकी श्रॉफने पॉपकॉर्नच्या वाढत्या किंमतींवर चिंता व्यक्त केली होती.