शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला रवाना; ममता बॅनर्जींचं ट्विट, किंग खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:28 IST2025-07-20T12:26:00+5:302025-07-20T12:28:09+5:30
शाहरुख खानला नेमकं झालं तरी काय?

शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला रवाना; ममता बॅनर्जींचं ट्विट, किंग खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना
Mamata Banerjee Prays Shahrukh Khan Health: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) हे नाव फक्त बॉलिवूडच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. रोमान्सचा बादशाह, किंग खान अशीही त्याची ओळख आहे. सध्या तो प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे तो अमिरेकत उपचारासाठी गेल्याचं बोललं जात आहे. यामुळे त्याचे चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत शाहरुखच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आणि तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहलं, "माझा भाऊ शाहरुख खानच्या स्नायूंच्या दुखापतीबद्दल कळताच मी काळजीत पडले आहे. लवकर बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा", असं म्हटलं. शाहरुख खान आणि ममता बॅनर्जी यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. शाहरुख अनेक वर्ष पश्चिम बंगाल टुरिझमचा ब्रँड अॅम्बेसेडर होता आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या माध्यमातून त्याचं बंगालशी खास नातं आहे.
शाहरुख खानचे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे चित्रपट गाजले होते. आता लवकच तो 'किंग' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही त्याच्या या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सौरभ शुक्ला यांसारखे स्टार्स देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांनी 'किंग' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी, हा चित्रपट २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Reports regarding my brother Shah Rukh Khan sustaining muscular injuries during shooting make me worried. Wish him speedy recovery. @iamsrk
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 19, 2025
शाहरुखला नेमकं काय झालं?
शाहरुख हा 'किंग' सिनेमाचं शुटिंग करताना गंभीर जखमी झाला असून तो उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याचं बोललं जातं होतं. पण, शाहरुख खानला चित्रपटाच्या सेटवर कोणतीही दुखापत झालेली नाही. तर त्याच्या जुन्या दुखापतींमुळे काहीवेळा त्याला वेदना होतात. त्यामुळे त्याला उपचारासाठी अमेरिकेला जावे लागते. आता अभिनेता या जुन्या दुखापतींच्या उपचारासाठीच अमेरिकेला गेला असल्याचं समोर येत आहे.