​पाहा, देशी सुपरहिरो ‘फ्लार्इंग जाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 17:23 IST2016-07-07T11:53:24+5:302016-07-07T17:23:24+5:30

बॉलिवूडचा ‘टायगर’ अर्थात टायगर श्रॉफ आता नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे. ‘फ्लार्इंग जाट’ या सुपरहिरो मुव्हीमध्ये टायगर दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज झाले.

See, the country's superhero 'Flying Jat' | ​पाहा, देशी सुपरहिरो ‘फ्लार्इंग जाट’

​पाहा, देशी सुपरहिरो ‘फ्लार्इंग जाट’

लिवूडचा ‘टायगर’ अर्थात टायगर श्रॉफ आता नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे. ‘फ्लार्इंग जाट’ या सुपरहिरो मुव्हीमध्ये टायगर दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज झाले. उद्या शुक्रवारी चित्रपटाचा टीजरही रिलीज होणार आहे. यात टायगर एका जाट सुपरहिरोच्या भूमिकेत आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजा हा चित्रपट घेऊन येतो आहे. ‘फ्लार्इंग जाट’ लोकांसाठी एक चांगला संदेश देणारा चित्रपट ठरेल, असे रेमो यावेळी म्हणाला. लोकांनी नियम पाळावे, असे मला वाटते. ‘फ्लार्इंग जाट’ हा केवळ सुपरहिरो असलेला सिनेमा नाही तर भक्कम संदेश देणारा सिनेमा आहे, असेही रेमोने सांगितले. ‘फ्लार्इंग जाट’मध्ये टायगर श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस व नाथन जोन्स यांच्या मुख्य भूमिका आहे. २५ आॅगस्टला हा चित्रपट रिलीज होतो आहे.


Web Title: See, the country's superhero 'Flying Jat'