आलियाच्या 'गंगूबाई कठियावाडी'चा सेट रिलीज आधी जमीनदोस्त, निर्मात्याला 15 कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 17:12 IST2020-05-07T16:57:22+5:302020-05-07T17:12:12+5:30

निर्मात्याला जवळपास १५ कोटींचे नुकसान होणार आहे.

Sanjay leela bhansali to incur a rs 15 crore loss for gangubai kathiawadi know here why gda | आलियाच्या 'गंगूबाई कठियावाडी'चा सेट रिलीज आधी जमीनदोस्त, निर्मात्याला 15 कोटींचे नुकसान

आलियाच्या 'गंगूबाई कठियावाडी'चा सेट रिलीज आधी जमीनदोस्त, निर्मात्याला 15 कोटींचे नुकसान

लॉकडाऊन पूर्वी संजय लीला भन्साळी यांनी त्यांचा आगामी सिनेमा 'गंगूबाई कठियावाडी'ची घोषणा केली होती. या सिनेमात मुख्य भूमिका आलिया भट साकारणार आहे. या सिनेमासाठी भन्साळी यांनी मोठा सेट तयार केला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी हा सेट तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे निर्मात्याला जवळपास १५ कोटींचे नुकसान होणार आहे. 

हिंदुुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार गंगूबाईचा सेट तोडण्याचा संजय लीला भन्साळी यांचा निर्णय योग्य आहे. सिनेमाची शूटिंग पुन्हा कधी सुरु होईल हे अजून निश्चित नाही. तोवर हा सेट तसाच ठेवला तर निर्मात्याला त्याचे भाडे द्यावे लागले. रिपोर्टनुसार सिनेमाचे शूटिंग सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सुरु करण्यात येईल. अशावेळी सेट तोडण्याचा घेतलेला निर्णय अधिक योग्य असेल.


या सिनेमात आलिया गंगूबाई कठियावाडीची भूमिका साकारणार आहे. आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे.

त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

Web Title: Sanjay leela bhansali to incur a rs 15 crore loss for gangubai kathiawadi know here why gda