लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 12:06 IST2021-10-09T11:55:51+5:302021-10-09T12:06:04+5:30
सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे.

लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर
साउथ सिने इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आणि 'द फॅमिली मॅन २' वेबसीरीजमुळे प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समांथा प्रभु रूथ (Samantha Ruth Prabhu) आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नुकताच पती अभिनेता नागा चैतन्यकडून घटस्फोट घेतला. दोघांचं लग्न तुटल्याने त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला. लोक त्यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे.
समांथा प्रभु रूथचा एकीकडे चार वर्षांचा संसार मोडला तर दुसरीकडे अशात तिच्याबाबत अनेक धक्कादायक अफवा पसरत आहेत. आता अभिनेत्रीने स्वत: अफवांचं खंडन केलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून तिने सर्वच समर्थकांचे आभार मानले आहे. तिने लिहिलं की, माझ्या या खाजगी नुकसानात तुमच्या भावानात्मक साथीने मला आनंद दिला. सर्वांचे आभार. सोबतच माझ्याबाबत पसरलेल्या अफवांपासून माझा बचाव करण्यासाठी तुमचे धन्यवाद. माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत की, माझं अफेअर आहे, मला मुलं नको होती, मी स्वार्थी आहे आणि माझं अबॉर्शन झालं आहे.
समांथाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून पतीसोबत घटस्फोटाची घोषणा केली होती. तिने लिहिले होते की, माझ्या शुभचिंतकांना मला हे सांगायचं आहे की, बराच विचार केल्यावर आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमचे मार्ग आता वेगळे आहेत. आम्ही नशीबवान आहोत की, आमच्या मैत्रीला एक दशकापेक्षाही जास्त काळ झाला आहे. मला विश्वास आहे की, आमचा मैत्रीचा स्पेशल बॉन्ड नेहमी असाच राहील. तुमच्या सर्वांच्या सपोर्टसाठी धन्यवाद.
नागार्जुनही दु:खी
नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. नागाचे वडील अभिनेते नागार्जुनसोबतही समांथाची बॉंडिंग खास होती. नागार्जुनही हे लग्न तुटल्याने दु:खी दिसले. ते यावर म्हणाले की, फारच जड मनाने मला हे सांगायचं आहे की, चै आणि सॅम यांच्यात जे काही झालं ते फार वाईट झालं. एका पत्नी आणि पतीमध्ये जे काही होतं ते खूप पर्सनल असतं. दोघेही चांगले आहेत. आमचा परिवार समांथासोबत घालवलेले क्षण कधीही विसरणार नाही आणि ती आमच्यासाठी नेहमीच खास राहिल. देव दोघांचंही भलं करो'.