सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे टायटल ट्रॅक लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:07 IST2021-05-05T17:03:40+5:302021-05-05T17:07:20+5:30
त. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे टायटल ट्रॅक लाँच
'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
जेव्हापासून दर्शकांनी ट्रेलरमध्ये टायटल ट्रॅक राधेचे टीजर ऐकले आहे, त्यांच्या उत्साहाला सीमा राहिलेली नाही. एक दिवस आधी, चित्रपटाच्या ज्यूक बॉक्ससोबत गाण्याचे ऑडियो प्रदर्शित करण्यात आले होते त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहेत. निर्मात्यांनी 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'च्या टायटल ट्रॅकचे अनावरण केले आहे. साजिद-वाजिद द्वारा रचित आणि साजिदच्या आवाजात हा एक एंटरटेनर ट्रॅक आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी गाण्यातील थिरकायला लावणाऱ्या संगीतावर डान्स करताना पाहता येणार आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान डैपर लुकमध्ये दिसणार असून सलमान-दिशाची जोड़ी मुख्य आकर्षण आहे. सलमान खान डॅशिंग दिसत असून हा ट्रॅक चित्रपटातील राधेच्या व्यक्तिरेखेला हुबेहूब सादर करतो आहे.
सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट देखील याच कथेवर आधारित असून सलमान गँगस्टर, रणदीप प्रॉसिक्यूटर आणि दिशा सुंदर मुलीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच 13 मे ला प्रदर्शित होणार आहे...