सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले; म्हटले, ‘तुझ्या गालापेक्षा माझा हात मोठा आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:00 IST2018-02-17T10:28:43+5:302018-02-17T16:00:55+5:30

सलमान खानची ही अभिनेत्री ट्रोलर्सवर चांगलीच संतापताना दिसून आली. होय, जरीन खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामध्ये ती ट्रोलर्सवर प्रचंड संतापताना दिसत आहे.

Salman Khan's actress told the trollers; Said, 'My hand is bigger than yours.' | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले; म्हटले, ‘तुझ्या गालापेक्षा माझा हात मोठा आहे’!

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले; म्हटले, ‘तुझ्या गालापेक्षा माझा हात मोठा आहे’!

मान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खान सध्या सोशल मीडियावर होणाºया ट्रोलिंगमुळे त्रस्त आहे. याबाबत तिने तिचे दु:ख नुकतेच सांगितले असून, त्यामध्ये तिचा संताप स्पष्टपणे दिसून आला. जरीनने म्हटले की, ‘मला खरोखरच आनंद होतो की, माझी मम्मी सोशल मीडियावर नाही. कारण ज्या पद्धतीने मला ट्रोल केले जाते ते बघून ती नक्कीच त्रस्त झाली असती. जरीनने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘ट्रोल करताना लोक जे काही लिहितात त्याचा त्रास केवळ आपल्यालाच होतो असे नाही तर आपल्या परिवारातील लोकांनाही होतो. त्यामुळे मला खरोखरच आनंद होतो की, माझी मम्मी सोशल मीडियावर नाही, अन्यथा तिला यासर्व गोष्टींचा प्रचंड त्रास सोसावा लागला असता. 

एमटीव्हीच्या नव्या शोमध्ये ‘एमटीव्ही ट्रोल पुलिस’मध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचा एक एपिसोड बघितल्यानंतर जरीनने या शोचा भाग बनण्यासाठी एमटीव्हीशी संपर्क साधला. जरीनच्या या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला असून, त्यामध्ये ती शोचा होस्ट रणवीर सिंग याच्यासोबत बघावयास मिळत आहे. शिवाय ट्रोलरविषयी तिच्या मनात प्रचंड राग असल्याचे दिसून येत आहे. ट्रोलरवर भडास काढताना जरीन म्हणतेय की, ‘आता तुझ्या कानशिलात देऊ काय?’

जरीनने म्हटले की, ‘मी तापसीचा एमटीव्ही ट्रोल पुलिस हा एपिसोड बघितला. मला असे वाटते की, एमटीव्हीने सुरू केलेला हा शो खरोखरच खूप महत्त्वपूर्ण असून, त्या लोकांची मदत करणारा आहे. आपल्या समाजात असे काही लोक आहेत, जे इंटरनेटच्या माध्यमातून माझ्यासारख्यांवर उलटसुलट कॉमेण्ट लिहितात. हे लोक समाजासाठी घातक आहेत. कारण त्यांच्या कॉमेण्टमुळे इतरांच्या आयुष्याचे काय होईल याचे त्यांना काहीच देणेघेणे नाही. अशा लोकांना संदेश देण्यासाठीच मी ‘एमटीव्ही ट्रोल पुलिस’ या शोचा भाग बनण्याचा विचार केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘१९२१’ या हॉररपटात जरीन खान बघावयास मिळाली. तिचा हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही.
 

Web Title: Salman Khan's actress told the trollers; Said, 'My hand is bigger than yours.'