कोण म्हणेल तू ६० वर्षांचा आहेस! भाईजानची पिळदार शरीरयष्टी पाहून चाहते थक्क, सलमानचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:20 IST2025-12-23T10:17:36+5:302025-12-23T10:20:02+5:30
सलमानने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भाईजानचे हे फोटो पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत.

कोण म्हणेल तू ६० वर्षांचा आहेस! भाईजानची पिळदार शरीरयष्टी पाहून चाहते थक्क, सलमानचे फोटो व्हायरल
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सुपरस्टार सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ६० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या खास दिवसाच्या सहा दिवस आधी सलमानने जिममधील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून त्याचे चाहते थक्क झाले असून, वयाच्या साठीतही त्याचा फिटनेस पाहून तरुणांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जिममधील हे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याचे पिळदार स्नायू आणि जबरदस्त बायसेप्स स्पष्टपणे दिसत आहेत. फोटो शेअर करताना सलमानने अतिशय मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, ''मी सुद्धा ६० वर्षांचा झाल्यावर असाच दिसावा!" यासोबतच त्याने आपल्या वाढदिवसाचे काउंटडाउन सुरू झाल्याचे सांगत 'आता ६ दिवस बाकी' असेही नमूद केले आहे.
फोटोंमध्ये सलमान काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे. वर्कआऊट केल्यानंतर बेंचवर बसून त्याने या पोज दिल्या आहेत. त्याचे हे रूप पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक चाहत्यांनी "तुम्ही ६० चे नाही तर अजूनही ३० वर्षांचेच वाटता" अशा कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी "असा कमबॅक असावा" असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, सलमानच्या या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवाला सलमानच्या वाढदिवशी 'किक २' चित्रपटाची अधिकृत घोषणा करू शकतात. विशेष म्हणजे, या भागात जॅकलिन फर्नांडिसच्या जागी क्रितीती सेनन मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय सलमान खानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.