सुपरहिट 'सुल्तान' साठी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होती पहिली पसंत, सलमाननेच केलेलं रिजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 15:41 IST2024-02-22T15:40:17+5:302024-02-22T15:41:40+5:30
अली अब्बास जफरने या मराठी अभिनेत्रीची सलमानच्या फार्महाऊसवर भेटही घडवून आणली होती.

सुपरहिट 'सुल्तान' साठी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होती पहिली पसंत, सलमाननेच केलेलं रिजेक्ट
बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'सुल्तान' (Sultan) प्रेक्षकांना भलताच पसंतीस पडला होता. यामधील सलमान खान (Salman Khan)आणि अनुष्का शर्माची (Anushka Sharma) केमिस्ट्रीही लोकांना आवडली. या स्पोर्ट्स ड्रामासाठी दोघांनीही मेहनत घेतली होती. सिनेमाने ६०० कोटींचा व्यवसाय केला. पण तुम्हाला माहितीये का अनुष्का शर्मा या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हती. स्वत: सलमान खाननेच याचा खुलासा केला. इतकंच नाही तर अली अब्बास जफरने एका अभिनेत्रीशी सलमान खानची भेटही घडवली होती आणि तीच अभिनेत्री सिनेमासाठी पहिली पसंत होती.
'बिग बॉस 15' च्या एका एपिसोडमध्ये शाहीद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) त्यांच्या 'जर्सी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी सलमान म्हणाला होता, "मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. सुल्तानची खरी स्टार तर हीच होती. ती मला भेटायला फार्महाऊसवरही आली होती. अली अब्बास तिला घेऊन आला होता. पण ती कोणत्याच अँगलने पहलवान वाटत नव्हती."
सलमान पुढे म्हणाला, "मी मनातच म्हणलं की ही पहलवान सारखी दिसतच नाही. तसंही अनुष्का सुद्धा तशी दिसत नव्हती पण मला माहित होतं की ती चांगलं काम करेल." ही अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूरच होती. तेव्हा मृणाल बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवत होती. तेव्हा सलमानने नवीन अभिनेत्रीला न घेता अनुष्का शर्मालाच घेणं पसंत केलं. तेव्हा मृणालनेही हे मान्य केलं की तिने तेव्हा वजन खूपच कमी केलं होतं.
मृणाल ठाकूरला दाक्षिणात्य सिनेमा 'सीतारामम' मधून लोकप्रियता मिळाली. सिनेमात ती कमालीची सुंदर दिसली. तसंच तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. शिवाय तिचा नुकताच 'हाय नॅना' हा सिनेमा रिलीज झाला. याही सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.