"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान
By देवेंद्र जाधव | Updated: June 26, 2025 13:05 IST2025-06-26T13:04:46+5:302025-06-26T13:05:19+5:30
सलमानने आयुष्यात पहिल्यांदा जाहीरपणे त्याचा फिटनेस मंत्रा आणि डाएट प्लान सांगितला आहे. हा प्लान तुम्हीही फॉलो करुन भाईजानसारखं फिट राहू शकता

"फक्त एक चमचा भात खातो आणि त्यासोबत.."; सलमानने पहिल्यांदाच सांगितला त्याचा डाएट प्लान
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान. वयाच्या ५९ व्या वर्षीही सलमान खान फिट अँड फाईन आहे. शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसं सलमान स्वतःच्या फिटनेससाठी वेळ देत असतो. सलमान अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सलमानने पहिल्यांदाच त्याच्या डाएट प्लानबद्दल मोकळेपणाने सांगितलं. याशिवाय वडील सलीम खान यांच्याविषयीही भाईजानने खास वक्तव्य केलं. त्यामुळे सर्वांना आनंद झाला.
सलमानने सांगितला त्याचा फिटनेस प्लान
सलमान खानला कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रश्न विचारला. "जी मोठी माणसं असतात ते चपाती खात नाहीत, भात खात नाहीत. हे खरंच आहे का? एवढा मोठा त्याग एखादा माणूस करु शकतो?" त्यावर सलमान म्हणाला, "हो, हे खरंय. मी एवढा त्याग करत नाही. मी सर्व खातो पण मी कधीही ओव्हरइटिंग म्हणजेच जास्त जेवत नाही. जेव्हा मला कळतं की, माझं पुरेसं जेवण झालं, तर त्यापलीकडे मी खात नाही. म्हणजेच फक्त एक किंवा दीड चमचा भात, मग त्यासोबत एखादी भाजी, चिकन किंवा मटण. बास्स!" अशाप्रकारे सलमानने मोजक्या शब्दात त्याचा डाएट प्लान सांगितला आहे.
पुढे सलमान त्याच्या वडिलांविषयी म्हणाला, "माझे वडील, या वयात नशीबाने खूप चांगलं जेवतात. दोन-तीन पराठे आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ. त्यांच्या जीवनाला शिस्त आहे. ते रोज सकाळी बँड स्टँडला चालायला जातात. जेव्हा आपल्याकडे लढवय्या बाप असतो, तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे." अशा शब्दात सलमान खानने वडील सलीम खान यांचं कौतुक केलं. सलमान खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा फ्लॉप झाला. आता सलमान गलवान घाटीच्या युद्धावर आधारीत सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात सलमान आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे.