‘स्वॅग से स्वागत’ करणा-या सलमान खानची ​पकडली गेली चोरी! इथे आहे, पुरावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 07:38 AM2017-11-30T07:38:01+5:302017-11-30T13:08:01+5:30

काही दिवसांपूर्वीच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे रिलीज झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या गाण्याने धूम केली. पण इंटरनेटवर धूम करणा-या या गाण्याबद्दलच एक बातमी आहे.

Salman Khan has been caught stealing the 'Welcome From Swag'! Here, proof is !! | ‘स्वॅग से स्वागत’ करणा-या सलमान खानची ​पकडली गेली चोरी! इथे आहे, पुरावा!!

‘स्वॅग से स्वागत’ करणा-या सलमान खानची ​पकडली गेली चोरी! इथे आहे, पुरावा!!

googlenewsNext
मान खान व कॅटरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे रिलीज झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या गाण्याने धूम केली. सोशल मीडियावर पहिल्या काही तासांत या गाण्याच्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले. पण इंटरनेटवर धूम करणा-या या गाण्याबद्दलच एक बातमी आहे. होय, लाखों लोकांना ताल धरायला लावणारे हे गाणे प्रत्यक्षात एका इंग्रजी गाण्याची कॉपी असल्याचे समोर आले आहे. या चोरीच्या मामल्यात आता सलमानही ओढला गेला आहे. केवळ विशाल-शेखर या संगीतकार जोडीलाच नाही तर लोकांनी या प्रकरणात सलमानलाही लक्ष्य केले आहे.



या इंग्रजी गाण्याची कॉपी आहे, स्वॅग से स्वागत...


रिलीज होताच ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे चार्टबस्टर बनले होते. गाण्यातील सलमानच्या रॅपसह यातील बीट्सची प्रशंसा झाली होती. पण आता हे गाणे DJ Katchच्या ‘द हॉर्न्स’ या गाण्याची कॉपी असल्याचे उघड झाले आहे. केवळ गाण्याचे संगीतचं नाही तर इंग्रजी गाण्यातील थोडीफार कोरिओग्राफी सुद्धा कॉपी-पेस्ट करण्यात आली आहे.

ALSO READ : सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’चे थीम साँग निघाले चोरीचे!

काही दिवसांपूर्वीच ‘टायगर जिंदा है’चे  थीम साँगची ट्यूनही एका सुपरहिट सीरिजच्या थीम साँगची कॉपी असल्याचे समोर आले होते.  ‘टायगर जिंदा है’च्या थीम साँगची ट्यून  स्पाई थ्रीलर ‘मिशन इम्पॉसिबल’पासून इन्स्पार्यड आहे. आता तर थीम साँगच्या टयूनप्रमाणेच या चित्रपटाचे एक गाणेही चोरीचे असल्याचे कळतेय.
‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने  दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता.  पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. पाच वर्षांनंतर एकत्र येत असलेल्या सलमान व कॅट या दोघांमधील केमिस्ट्री चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिसून येत आहे. 

Web Title: Salman Khan has been caught stealing the 'Welcome From Swag'! Here, proof is !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.