काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:54 IST2025-10-27T17:51:20+5:302025-10-27T17:54:58+5:30
सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?
बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक असलेल्या सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी एकाच चित्रपटात एकत्र काम केलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम'मध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकत्र दिसले होते हे आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतु २००० साली आलेल्या आणखी एका चित्रपटात हे तिन्ही कलाकार पहिल्यांदा आणि शेवटचं एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले होते.
सलमान - अभिषेक - ऐश्वर्याचा तो सिनेमा कोणता?
राज कंवर दिग्दर्शित 'ढाई अक्षर प्रेम के' या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमान खानने एक छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील एका सीनची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दृश्यात सलमान खान एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे, तर अभिषेक बच्चन त्याच्या बाजूला बसलेला आहे. जेव्हा ऐश्वर्या लिफ्टसाठी हात करते, तेव्हा ट्रक थांबत नाही आणि पुढे निघून जातो. यानंतरच्या सीनमध्ये सलमान अभिषेकला एके ठिकाणी सोडून पुढे जाताना दिसतो. अशाप्रकारे सलमान-अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनने या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
#SalmanKhan , Aishwarya Rai, and Abhishek Bachchan appeared together in dapk pic.twitter.com/uOKRabOJjy
— Devil V!SHAL (@VishalRC007) October 26, 2025
ऐश्वर्या आणि अभिषेकची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री
'ढाई अक्षर प्रेम के' व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी 'कुछ ना कहो', 'उमराव जान', 'धूम २', 'गुरु', 'सरकार राज' आणि 'रावण' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अभिषेक - ऐश्वर्या या जोडीने एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं आणि २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. अलीकडच्या काळात दोघं एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. पण त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.