'सैयारा' च्या यशानंतर अनीत पड्डाला मिळाली नव्या प्रोजेक्टची ऑफर; सोबतीला असेल 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:12 IST2025-07-28T19:07:16+5:302025-07-28T19:12:55+5:30
सध्या जगभरात मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाची चर्चा आहे.

'सैयारा' च्या यशानंतर अनीत पड्डाला मिळाली नव्या प्रोजेक्टची ऑफर; सोबतीला असेल 'ही' अभिनेत्री
Aneet Padda: सध्या जगभरात मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाची चर्चा आहे. सैयारा' हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २०२५ मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असा हा चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाद्वारे अहान पांडे आणि अनीत पड्डा इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं सगळेच कौतुक करत आहेत. दरम्यान, अशातच सैयाराची बॉक्स ऑफिसवर जादू कायम असतानाच अनीत पड्डाला नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाल्याची माहिती समोर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार , 'सैयारा' चित्रपटानंतर अभिनेत्री अनीत पड्डा आता या नवीन वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 'न्याय'असं तिच्या आगामी वेबसीरिजचं नाव असणार आहे. हा एक कोर्टरुन ड्रामा असून त्यामध्ये अनीतसह अभिनेत्री फातिमा सना शेख देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, याबाबत फातिमा किंवा अनीतने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सैयारापूर्वीच अनीत पड्डाने हा प्रोजेक्ट साईन केला होता. यामध्ये फातिमा सना शेख पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
लवकरच ही सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाणार आहे.