सैफ अली खानचा झालेला भीषण अपघात, चेहऱ्यावर पडले 100 टाके; नेमके काय झाले? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:22 IST2025-01-17T18:20:22+5:302025-01-17T18:22:30+5:30

Saif Ali Khan : चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, 'या' अभिनेत्रीने तात्काळ रुग्णालयात नेले.

Saif Ali Khan's terrible accident in the year of 2000, 100 stitches on his face; What exactly happened? | सैफ अली खानचा झालेला भीषण अपघात, चेहऱ्यावर पडले 100 टाके; नेमके काय झाले? पाहा...

सैफ अली खानचा झालेला भीषण अपघात, चेहऱ्यावर पडले 100 टाके; नेमके काय झाले? पाहा...

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी(दि.16) रात्री एका अज्ञाताने घरात घुसून चाकू हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने सैफवर सपासप चाकूचे सहा वार केले. या घटनेत सैफ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  देशात सेलिब्रिटीही सुरक्षित नाही, तर सर्वसामान्यांचे काय होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

सैफ अली खानला पडले 100 टाके
लीलावती रुग्णालयात दाखल सैफ अली खानची प्रकृती आता धोक्याबाहेर असून, तो हळुहळू रिकव्हर होत आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला सैफ अली खानबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला मोठा धक्काबसेल. सुमारे 25 वर्षांपूर्वी, म्हणजेच 2000 साली सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'क्या कहना' चित्रपटाच्या सेटवर सैफचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला 100 टाके पडले होते. 

प्रितीला इम्प्रेस करण्याच्या नादात सैफचा अपघात
2004 मध्ये सैफ अली खान आणि प्रिती झिंटा 'कॉफी विथ करण' शोमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सैफच्या अपघाताबाबत खुलासा केला होता. सैफ अली खान म्हणाला होता, मी रोज जुहू बीचवर बाइकवरुन उडी मारण्याचा सराव करायचो. पुढे हा सीन शूट करण्यासाठी आम्ही खंडाळ्याला गेलो. शुटिंगच्या दिवशी खूप पाऊस पडत होता, सगळीकडे चिखल झाला होता. आम्ही सीन शूट केला, पण प्रितीला इम्प्रेस करण्यासाठी मी पुन्हा सीन करायला गेलो. पण, दुचाकी घसरली आणि मी एका खडकावर आदळलो. माझा चेहरा पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. 

सैफची जखम पाहून प्रिती घाबरली
सर्वांनी मला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले अन् डॉक्टरांनी जवळपास 100 टाके घातले. माझा पूर्ण चेहरा पट्ट्यांनी झाकलेला होता. मी फ्रँकेन्स्टाईन सारखा दिसत होतो. माझी अवस्था पाहून प्रिती खूप घाबरली होती. माझी माजी पत्नी अमृता तिथे उपस्थित नव्हती, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते नव्हते. माझ्यावर तात्काळ प्लास्टिक सर्जरी करावी लागणार होती. त्यामुळे प्रितीनेच मेडिकल फॉर्मवर सही केली, अशी माहिती सैफने त्या शोमध्ये दिली होती.

Web Title: Saif Ali Khan's terrible accident in the year of 2000, 100 stitches on his face; What exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.