"ती इतर अभिनेत्यांसोबत काम करायची,तेव्हा…", पत्नी करीनाबद्दल सैफचं वक्तव्य, रिलेशनशिपबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:24 IST2025-12-17T11:15:42+5:302025-12-17T11:24:12+5:30
पत्नीला इतर अभिनेत्यांसोबत काम करताना पाहिल्यावर सैफ व्हायचा इनसिक्योर? अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत,म्हणाला...

"ती इतर अभिनेत्यांसोबत काम करायची,तेव्हा…", पत्नी करीनाबद्दल सैफचं वक्तव्य, रिलेशनशिपबद्दल म्हणाला...
Saif Ali Khan On Wife Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीन कपूर हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केलं आणि त्यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत. या दोघांच्या वयामध्ये साधारण १० वर्षांचं अंतर आहे. एका चित्रपटात काम करताना ते एकमेकांच्या जवळ आले आणि अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष ते सुखाने संसार करत आहेत. अशातच अभिनेता सैफ अली खान सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे.
अलिकडेच सैफ अली खान याने 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया' ला मुलाखत दिली.जिथे त्याने स्वतःबद्दल,त्याची पत्नी करीना कपूर तसेच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या.२००७ साली 'टशन' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूर खान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या मुलाखतीत अभिनेता म्हणाला,"सुरुवातीला माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या.जेव्हा ती इतर अभिनेत्यांसोबत काम करायची, तेव्हा मी त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नव्हतं.अशा वेळी एकमेकांच्या भावना
समजून घ्याव्या लागतात आणि विश्वासही असणं तितकंच महत्त्वाचं असतं.जेव्हा नातं नवीन असतं आणि तुम्हाला जर समोरचा व्यक्ती जरा जास्तच काळजी वाटत असेल तर तेव्हा गोष्टी कठीण होऊ शकतात."
त्यानंतर अभिनेत्याने सांगितलं,"याआधी मी अशा मुलींना भेटलो ज्यांचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. मला वाटलं की माझे प्रतिस्पर्धी आहेत तेच तिचे सहकारी आहेत आणि मी विचार करू लागलो, हे सगळं कसं होणार आहे? पण प्रेम सगळ्यावर मात करतं."
करीनाचं कौतुक करत सैफ म्हणाला...
यादरम्यान,सैफने पत्नी करीनाचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, एक अभिनेत्री आणि स्टार म्हणून तिला जे काही व्हायचं आहे, त्यासाठी करीनाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तिला एक उत्तम आई, पत्नी आणि गृहिणी सुद्धा व्हायचं आहे. यावेळी सैफने असेही सांगितले की, तो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा नेहमी करीनाचे सुख निवडेल, अगदी त्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या यशाचा आनंद साजरा करावा लागला तरीही.सैफने पुढे म्हटलं, "मी भाग्यवान आहे की ती माझ्या आयुष्यात आहे, कारण ती खूप संयमी स्त्री आहे. तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे. करीनाने आमचं कुटुंब एकत्र बांधून ठेवलं आहे."अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.