सागरिका घाटगेने उघड केले ‘चक दे इंडिया’ ते क्रिकेटरशी लग्नाचे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:27 IST2017-11-02T15:57:30+5:302017-11-02T21:27:30+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज जहीर खान आणि चक दे इंडिया गर्ल सागरिका घाटगे लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. ...

Sagarika Ghatge revealed Chak De India connection to cricketer! | सागरिका घाटगेने उघड केले ‘चक दे इंडिया’ ते क्रिकेटरशी लग्नाचे कनेक्शन!

सागरिका घाटगेने उघड केले ‘चक दे इंडिया’ ते क्रिकेटरशी लग्नाचे कनेक्शन!

रतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज जहीर खान आणि चक दे इंडिया गर्ल सागरिका घाटगे लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. जहीर आणि सागरिकाचा विवाह या महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र तारखेबाबतचा अद्यापपर्यंत खुलासा केला गेला नसल्याने दोघांच्याही चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान जहीरने रिसेप्शन २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केल्याने त्या आतच दोघे विवाहबंधनात अडकतील हे निश्चित मानले जात आहे. दोघांचा साखरपुडा याच वर्षाच्या २४ एप्रिल रोजी झाला होता. दिवाळी झाल्यानंतर दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या तयारीस सुरुवात केली होती. परंतु आता सागरिकाने जहीरसोबतच्या नात्याविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. 

जहीर आणि तिच्यातील नात्याविषयी सांगताना सागरिकाने म्हटले की, ‘चक दे इंडिया’मध्ये माझी भूमिका आणि हे नाते जवळपास सारखेच आहे. मला दोन्हीवरही अभिमान वाटतो. पुढे बोलताना सागरिकाने म्हटले की, ‘चक दे इंडिया’मध्ये मी एका क्रिकेटरला डेट करीत होती. मात्र त्याच्यासोबत लग्न केले नव्हते कारण ती रीअल लाइफ होती. परंतु आता मी रिअल लाइफमध्ये एका क्रिकेटरला डेट करीत असून, त्याच्यासोबत लग्नही करणार आहे. 

तर जहीरने त्याचा अनुभव सांगताना म्हटले की, ‘मला माझ्या कुटुंबीयांचा लग्नासाठी होकार मिळविताना चांगलीच कसरत करावी लागली. मी जेव्हा माझ्या परिवारातील सदस्यांना सागरिकाविषयी सांगितले तेव्हा त्यांनी सर्वात अगोदर ‘चक दे इंडिया’ची सीडी मागविली. संपूर्ण परिवाराने एकत्र बसून हा चित्रपट बघितला. त्यानंतर त्यांनी माझ्या लग्नाला होकार दिला. 

खरं तर जहीर आणि सागरिकाच्या चाहत्यांना दोघांनी लवकरात लवकर विवाहबंधनात अडकावे हीच अपेक्षा आहे. आता हे दोघे त्यांच्या लग्नाची तारीख केव्हा जाहीर करणार याकडे त्यांचे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: Sagarika Ghatge revealed Chak De India connection to cricketer!