Rohit Shetty : सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:55 IST2026-02-17T15:53:24+5:302026-02-17T15:55:01+5:30

Rohit Shetty : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं गूढ आता हळूहळू उलगडत आहे. या खळबळजनक घटनेमागे एका सुनियोजित कटाचा खुलासा झाला आहे.

Rohit Shetty house firing conspiracy decoded upstf mumbai police arrests | Rohit Shetty : सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

Rohit Shetty : सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं गूढ आता हळूहळू उलगडत आहे. या खळबळजनक घटनेमागे एका सुनियोजित कटाचा खुलासा झाला आहे. तपासात समोर आलं आहे की, आधी घराची रेकी करण्यात आली आणि त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार गोळीबार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली असून आता त्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.

रेकीची जबाबदारी सनी आणि सोनूवर

तपासात असं समोर आलं आहे की, सनी आणि सोनूने सर्वात आधी परिसराची रेकी केली होती. दोघेही अनेकदा परिसरात फिरले आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. घराबाहेरील हालचाली आणि एन्ट्री-एक्झिट पॉइंट्सची नोंद करण्यात आली. त्यानंतर ही संपूर्ण माहिती मुख्य शूटर दीपकपर्यंत पोहोचवण्यात आली. रेकीच्या आधारावरच गोळीबाराची वेळ निश्चित करण्यात आली होती. पोलिसांच्या मते हा गुन्हा पूर्ण तयारीनिशी करण्यात आला होता.

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

दीपकने झाडल्या गोळ्या

मुख्य शूटर दीपकने रोहित शेट्टीच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. तो आग्रा येथील रहिवासी आहे. या संपूर्ण शूटआउटमध्ये एकूण ७ जण सामील होते. हे सर्वजण आग्रा, नोएडा आणि इटावा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. गुन्हा करण्यासाठी सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूलचा वापर करण्यात आला. शस्त्र गँगकडून पुरवण्यात आलं होतं, असंही तपासात निष्पन्न झालं आहे. घटनेनंतर सर्व आरोपी वेगवेगळ्या दिशेला फरार झाले होते.

रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर

ऋतिकने केली लपण्यास मदत

गोळीबारानंतर आरोपींना लपवून ठेवण्यात ऋतिकची महत्त्वाची भूमिका होती. तो सोनूचा सख्खा भाऊ असल्याचं समजतं. या दोन्ही भावांनी मिळून इतर शूटर्सना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. त्यानंतर जतिन भारद्वाज आणि विशाल यांनीही त्यांना लपण्यास मदत केली. घटनेनंतर आरोपी काही दिवस दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये थांबले होते असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले.

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल

५ कोटींची खंडणी

या संपूर्ण कटामागे शुभम लोणकर गँगचं नाव जोडलं गेलं आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरशी संबंधित असलेल्या या गँगने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीसाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार करण्यात आला. घटनेनंतर शुभम लोणकरकडून गोलू पंडितला मोठी रक्कम देण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. पोलीस या व्यवहाराचाही तपास करत आहेत.

ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार

विष्णू कुशवाहा ठरला मुख्य दुवा

पकडण्यात आलेला विष्णू कुशवाहा हा शूटर आणि गँग यांच्यातील महत्त्वाचा दुवा होता. त्यानेच दीपक आणि त्याच्या साथीदारांना हे काम दिलं होतं. पोलिसांच्या मते, संपूर्ण प्लॅनिंग सोशल मीडिया आणि फोन कॉल्सद्वारे करण्यात आलं होतं. विष्णूनेच दोन्ही बाजूंमध्ये संपर्क टिकवून ठेवला होता. घटनेनंतर शूटरना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यातही त्याची भूमिका होती. या खुलाशानंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

STF आणि मुंबई पोलिसांचं संयुक्त ऑपरेशन

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हरियाणातील झज्जर आणि गाझियाबादमधून सातही आरोपींना अटक केली आहे. मुख्य शूटर दीपकसह सनी, सोनू, ऋतिक, विष्णू कुशवाहा, जतिन भारद्वाज आणि विशाल यांना पकडण्यात आलं आहे. सर्व आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केला जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होऊ शकतात.

Web Title : रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी: रेकी, शूटिंग और अंदर की कहानी।

Web Summary : रोहित शेट्टी के घर पर सुनियोजित हमले का खुलासा। सनी, सोनू ने रेकी की; दीपक ने गोली चलाई। राज्यों में सात गिरफ्तार। रंगदारी का मकसद संदिग्ध। पुलिस नेटवर्क की जांच कर रही है।

Web Title : Rohit Shetty house firing: Recce, shooting, and the inside story.

Web Summary : Investigation reveals planned attack on Rohit Shetty's house. Sunny, Sonu did recce; Deepak fired. Seven arrested across states. Extortion motive suspected. Police investigate network.