Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:49 AM2022-12-18T08:49:21+5:302022-12-18T08:50:53+5:30

आपल्या गोड हास्याने माधुरी दीक्षित समोरही भाव खाऊन गेलेली अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

renuka-shahane-says-she-always-get-rejected-in-audition-dosen't-get-audition-process | Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

googlenewsNext

Renuka Shahane : आपल्या गोड हास्याने माधुरी दीक्षित समोरही भाव खाऊन गेलेली अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ९० च्या दशकात हम आपके है कौन (Hum Aapke Hai Kaun) सिनेमामुळे रेणुकाला ओळख मिळाली. मात्र आता काळ बदलला आहे. सध्याची ऑडिशनची प्रक्रिया मला समजत नाही, मी नेहमीच ऑडिशनमध्ये रिजेक्ट होते, असा खुलासा रेणुकाने केला आहे.

एका मुलाखतीत रेणुकाने इंडस्ट्रीत कसे बदल होत आहेत हे सांगितले. रेणुका म्हणते, 'दिग्दर्शकाला जसे अपेक्षित आहे तशी मी माझी भुमिका समजुन घेण्याचा प्रयत्न करते. मात्र आजकाल असे होत नाही. कास्टिंग डायरेक्टर्सचे असिस्टंट येतात आणि ते क्यूज देतात. ते तुम्हाला समजावतात. पण मला ही प्रक्रिया समजत नाही. यामुळेच मी ऑडिशन प्रक्रिया पास करु शकत नाही. परिणामी मी रिजेक्ट होते. पण मी रिजेक्शनमुळे मुळीच निराश होत नाही कारण मी एक दिग्दर्शिकाही आहे. अनेकदा मला एखाद्या भुमिकेसाठी दुसराच अभिनेता जास्त योग्य वाटतो याचा अर्थ पहिल्या अभिनेत्याला काम करता येत नाही असे होत नाही.'

गोविंदा नाम मेरा मध्ये दिसणार रेणुका

विकी कौशलच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातरेणुका शहाणेची भुमिका आहे. रेणुका म्हणते, 'शशांक खेतान यांचा मला समोरुन फोन आला आणि त्यांनी मला या भुमिकेसाठी विचारणा केली. त्यांना या भुमिकेसाठी मीच हवी होते.'

रेणुका लवकरच एका मराठी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. आणि एका हिंदी सिनेमातही रेणुका दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट पुढील वर्षी रिलीज होत आहेत.

Web Title: renuka-shahane-says-she-always-get-rejected-in-audition-dosen't-get-audition-process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.