रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, "मला त्याचा हसरा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:54 IST2025-01-28T11:53:29+5:302025-01-28T11:54:11+5:30
रश्मिकाचं करिअर जोमात असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही रोमान्स सुरु आहे.

रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, "मला त्याचा हसरा..."
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सतत चर्चेत असते. तिचे एकामागोमाग सिनेमे रिलीज होत आहेत. 'पुष्पा २' च्या यशानंतर आता ती 'छावा' या हिंदी सिनेमात दिसणार आहे. विकी कौशल 'छावा' मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका त्यांची पत्नी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत 'सिकंदर' सिनेमातही दिसणार आहे. रश्मिकाचं करिअर जोमात असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही रोमान्स सुरु आहे. 'हँडसम हंक' विजय देवरकोंडासोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा असतात. नुकतंच तिने अप्रत्यक्षरित्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या चर्चा कायमच जोर धरुन असतात. कधी दोघं मालदीव व्हॅकेशनला जातात तर कधी डिनर डेटवर असतात. दोघंही वेगवेगळे फोटो पोस्ट करतात मात्र चाहते ते एकत्र असल्याचं शोधून काढतात. नुकतंच 'द हॉलिवूड रिपोर्टर'ला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, "घर म्हणजे माझं हॅप्पी प्लेस आहे. मला यामुळे स्थिर वाटतं. मला जमिनीशी जोडून ठेवतं. यश येतं जातं पण घर, आपली माणसं नेहमीच राहतात. मला आज कितीही प्रेम, प्रसिद्धी मिळत असली तरी आजही मी एक मुलगी, बहीण आणि फक्त एक पार्टनर आहे. मी खरोखरंच माझ्या वैयक्तिक आयुष्याचा सम्मान करते."
पार्टनरमध्ये आकर्षित करणारी ती कोणती गोष्ट आहे यावर रश्मिका म्हणाली, "असं म्हणतात डोळे बोलतात. माझा त्यावर विश्वास आहे. ज्यांचा हसरा चेहरा आहे आणि जो आसपासच्या लोकांचा सम्मान करतो मग ते कोणीही असो अशा लोकांवर विश्वास असतो आणि मी त्यांच्याकडे आकर्षित होते."
रश्मिकाने पार्टनरबद्दल बोलून नकळतपणे रिलेशन कन्फर्मच केलं आहे. रश्मिका आणि विजय यांनी 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तेव्हापासून दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.