ग्लोबल ट्रेंड बनलंय 'धुरंधर'चं 'Fa9la' गाणं; प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला गायक फ्लिपरॅची, म्हणाला-"विश्वास बसत नाहीये,कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:24 IST2025-12-18T13:17:31+5:302025-12-18T13:24:45+5:30
'धुरंधर' मधील 'Fa9la'गाणं व्हायरल झाल्यावर फ्लिपरॅचीने व्यक्त केला आनंद, म्हणाला-"लोकांना.."

ग्लोबल ट्रेंड बनलंय 'धुरंधर'चं 'Fa9la' गाणं; प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला गायक फ्लिपरॅची, म्हणाला-"विश्वास बसत नाहीये,कारण..."
Dhurandhar fa9la Song Singer Flipperachi Raction: सध्या संपूर्ण जगभरात आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय खन्नाची. धुरंधरमधील त्याचे डायलॉग्स, अभिनय आणि त्याचं एन्ट्री सॉंग सध्या प्रचंड चर्चेत आहे. शेर ए बलूच या गाण्यासह अक्षय खन्ना आता ट्रेंडमध्ये आला आहे. या गाण्यावर लोक डान्स व्हिडीओ, रिल्स बनवताना दिसत आहेत. हे गाणं बहरीनचा रॅपर हुसाम असीम यानं गायलंय. त्याला फ्लिपरॅची (Flipperachi) या नावानंही ओळखलं जातं. या गाण्याला जगभरातून मिळणारा प्रतिसाद पाहून त्यानं आनंद व्यक्त केला आहे.
'Fal9a' गाणे हिट झाल्यानंतर गायक फ्लिपरॅचीने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्ही सोबत संवाद साधताना तो म्हणाला," मला खरंच विश्वास बसत नाहीये की हे गाणं लोक इतकं उचलून धरतील. चित्रपट प्रदर्शित झाला,तो यशस्वी झाला आणि त्यानंतर जे घडतंय ते सगळ्यांनाच माहित आहे. खरंतर, लोकांना मी हेही माहित नाही की मी काय गायलंय. परंतु, त्याचे बिट्स पावरफुल आहेत. या बिट्समुळे लोक गाण्याशी पटकन कनेक्ट झाले. प्रेक्षकांच्या ते पसंतीस उतरलं.भारतातील लोकांना हे गाणं इतकं आवडेल असं मला वाटलंच नव्हतं. या गाण्यामध्ये थोडाफार भारतीय लहेजा आहे.याचा प्रेक्षकांच्या मनावर जो इम्पॅक्ट पडलाय, त्याच्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता. "
त्यानंतर गायक चित्रपटाबद्दल म्हणाला," हा चित्रपट फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात तुफान चालतो आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. मी अक्षय खन्नाचा खूप मोठा चाहाता आहे, त्यामुळे हा चित्रपट नक्की बघेन. "शिवाय फ्लिपरॅची असं देखील म्हणाला, या चित्रपटासंदर्भात त्याला सोशल मीडियासह इतर ठिकाणीही रिल्स आणि मीम्स दिसत आहेच. जितकं शक्य होईल तितक्या पोस्टना तो रिप्लाय देत आहे.
'धुरंधर' रीलिज होऊन केवळ १३ दिवस झाले आहेत आणि या १३ दिवसात रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या सिनेमा आता ४५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनाच्या १३ व्या दिवशी म्हणजे काल बुधवार १७ डिसेंबर रोजी या चित्रपटाने २५.५० कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम केला आहे.