​पकडली गेली रणवीरची चोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 19:32 IST2016-06-20T14:02:04+5:302016-06-20T19:32:04+5:30

होय, ‘बेफिक्रे’च्या शूटींगमध्ये बिझी असलेल्या रणवीर सिंह याची चोरी अलीकडेच पकडली गेली. ‘बेफिक्रे’साठी रणवीर दिवसरात्र टोन्ड बॉडीसाठी मेहनत घेतोय. ...

Ranveer was caught !! | ​पकडली गेली रणवीरची चोरी!!

​पकडली गेली रणवीरची चोरी!!

य, ‘बेफिक्रे’च्या शूटींगमध्ये बिझी असलेल्या रणवीर सिंह याची चोरी अलीकडेच पकडली गेली. ‘बेफिक्रे’साठी रणवीर दिवसरात्र टोन्ड बॉडीसाठी मेहनत घेतोय. यासाठी एक पर्सनल ट्रेनर सावलीसारखा रणवीर सोबत आहे. पण सेटवर अचानक रणवीरच्या हाती चॉकलेट स्प्रेड लागले आणि रणवीरच्या तोंडाला पाणी सुटले. न राहवून चोरून लपून चॉकलेट स्प्रेड खाण्याचा एक प्रयत्न त्याने करून पाहिला. पण अरेरे!! पर्सनल ट्रेलर लोएड स्टीवन याने नेमकी रणवीरची ही चोरी पकडली आणि तो अक्षरश: रणवीरकडे धावलाच.. रणवीरला चॉकलेट स्प्रेड खाण्यापासून रोखण्याची लोएडची ही धडपड कॅमेºयात कैद झाली. हा फोटो खुद्द लोएडनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाहू यात तर!!

Web Title: Ranveer was caught !!