सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:50 IST2026-01-27T12:45:51+5:302026-01-27T12:50:10+5:30

‘बॉर्डर २’च्या वादळात ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं, ठरला ब्लॉकबस्टर; केली कोट्यावधींची कमाई

ranveer singh starrer dhurandhr creat history on box office competing with border 2  | सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला?

सनी देओलच्या 'बॉर्डर २' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! प्रजासत्ताक दिनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी; तुम्ही बघितला?

Border 2 Movie: सध्या हिंदी सिनेविश्वात अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर-२' या देशभक्तीपर चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.  २३ जानेवारी २०२६ रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सनी देओल स्टारर या सिनेमाने प्रदर्शनाच्या ४ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे.  त्यातच काल प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत अनेक बिज बगेट चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. मात्र, असं असतानाही सनी देओलच्या 'बॉर्डर-२' ला या सिनेमाने तगडं आव्हान दिलं आहे. 

अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बॉर्डर-२' सिनेमाने अवघ्या ४ दिवसांत १७७ कोटींची कमाई करत दोनशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. परंतु, जवळपास ५३ दिवसांपूर्वी रिलीज झालेला धुरंधर सिनेमा 'बॉर्डर-२' ला काटें की टक्कर देताना दिसतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सनी देओलच्या 'बॉर्डर-२' सिनेमाने आतापर्यंत भारतात १८० कोटींचा गल्ला जमवला आहे. पण प्रजासत्ताक दिनी रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाचं वादळ काही कमी होत नाही. प्रदर्शनाच्या ५३ व्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ची क्रेझ पाहायला मिळाली. २६ जानेवारीला या चित्रपटाच्या तिकिटांची मोठी विक्री झाली. 

'धुरंधर' या चित्रपटाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी १००० कोटी रुपये कमाई करून विक्रम रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १२९४ कोटींची कमाई केली आहे, ज्याने बाहुबली २ आणि "पुष्पा द रुलर सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे जवळपास ८ आठवड्यानंतर या चित्रपटाची जादू कायम असल्याने बॉर्डर-२ ला याचा कमाईच्या बाबतीत फटका बसू शकतो.

Web Title : सनी देओल की 'बॉर्डर 2' को रणवीर सिंह की 'धुरंधर' से टक्कर

Web Summary : सनी देओल की 'बॉर्डर 2' को रणवीर सिंह की 'धुरंधर' से कड़ी टक्कर मिल रही है। 'बॉर्डर 2' ने भारत में ₹180 करोड़ कमाए, लेकिन 'धुरंधर' का प्रदर्शन मजबूत रहा, गणतंत्र दिवस पर ₹1000 करोड़ और दुनिया भर में ₹1294 करोड़ कमाए, जिससे 'बॉर्डर 2' की बॉक्स ऑफिस पर पकड़ कमजोर हो सकती है।

Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar' Challenges Sunny Deol's 'Border 2' at Box Office

Web Summary : Sunny Deol's 'Border 2' is facing tough competition from Ranveer Singh's 'Dhurandhar'. Despite 'Border 2' earning ₹180 crore in India, 'Dhurandhar' continues its strong performance, earning ₹1000 crore on Republic Day and a total of ₹1294 crore worldwide, challenging 'Border 2's box office dominance.