Video : घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीर सिंगचा खुलासा, दीपिकाच्या डायलॉगवर उत्तर देत म्हणाला, 'गॅरंटी देतो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:53 AM2023-03-29T08:53:26+5:302023-03-29T08:55:02+5:30

दीपिकाचा एक डायलॉग आणि रणवीर सिंगने दिलं थेट उत्तर

ranveer singh show his love for deepika padukone amidst divorce rumours | Video : घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीर सिंगचा खुलासा, दीपिकाच्या डायलॉगवर उत्तर देत म्हणाला, 'गॅरंटी देतो...'

Video : घटस्फोटाच्या चर्चांवर रणवीर सिंगचा खुलासा, दीपिकाच्या डायलॉगवर उत्तर देत म्हणाला, 'गॅरंटी देतो...'

googlenewsNext

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतलं कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्यात सध्या आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. वाढदिवस असो किंवा दीपिकाची ऑस्करवारी दोघांनी एकमेकांसाठी एकही सोशल मीडिया पोस्ट टाकली नाही. त्यामुळे दोघंही घटस्फोट घेणार अशा अफवाही सुरु झाल्या. मात्र आता नुकतंच रणवीर सिंगने या सर्व अफवा दूर केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स'मध्ये (Indian Sports Honour Awards) रणवीरने एक विधान केले.

'इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स २०२३' साठी अनेक कलाकार आणि खेळाडू एकत्र आले होते. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या फेव्हरेट कपलने नेहमीप्रमाणेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर या कार्यक्रमात रणवीर-दीपिकाने प्रकाश पदुकोण यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी होस्टच्या कोणा एका प्रश्नावर दीपिका तिचा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' मधील डायलॉग म्हणते. 'अगर आप किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने की कोशिश मे लग जाती है.' यानंतर सर्व टाळ्या वाजवतात तोच रणवीर सिंग माईक घेऊन म्हणतो, 'मला विचारा, याची खात्री देऊ शकतो मी.' यानंतर एकच हशा पिकतो.

दरम्यान या सोहळ्यासाठी पोहोचल्यानंतर रेड कार्पेटवर दीपिका रणवीरला इग्नोर करतानाचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. गाडातून उतरल्यानंतर रेड कार्पेटवर येत असताना रणवीर दीपिकाचा हात पकडण्यासाठी पुढे येतो मात्र दीपिका त्याला हात देत नाही. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि सगळीकडेच त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.

दीपिकाचा नुकताच 'पठाण' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. तर आता ती आगामी 'फायटर' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंग आणि आलिया भटचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: ranveer singh show his love for deepika padukone amidst divorce rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.