Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:49 PM2021-12-23T12:49:44+5:302021-12-23T12:50:53+5:30

Ranveer singh: सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत.

ranveer singh to share profit along with 20 crores fees for movie 83 | Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

googlenewsNext

Ranveer Singh Fees for 83: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा '83' हा बहुप्रतिक्षीत ठरलेला चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारताने १९८३ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर ’83’ हा चित्रपट  आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्याच्या भूमिकेवर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्येच आता या चित्रपटासाठी त्याने किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.

कपिल देव यांनी '83' साठी स्टोरी सांगायचे किती पैसे घेतले माहितीये का? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीरने या चित्रपटासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. विशेष म्हणजे केवळ २० कोटीच नाही. तर, रणवीरने या चित्रपटाच्या प्रॉफिटमधील अर्धा वाटादेखील घेतल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार हे कलाकार चित्रपटाच्या प्रॉफिटमधून अर्धा हिस्सा घेत होते.

दरम्यान, या चित्रपटात रणवीरसह त्याची पत्नी, अभिनेत्री दिपिका पदुकोणने देखील स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात तिने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

रणवीर व्यतिरिक्त 'हे' कलाकार झळकले मुख्य भूमिकेत 

या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर,सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी. विर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नींच्या भूमिकेत निशांत दहिया हे कलाकार झळकले आहेत. तसंच पंकज त्रिपाठी यांनी टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका वठवली आहे.
 

Web Title: ranveer singh to share profit along with 20 crores fees for movie 83

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.