रणवीर सिंगचा '८३'च्या वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपट होणार या दिवशी रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 06:38 AM2018-02-05T06:38:18+5:302018-02-05T12:09:05+5:30

सध्या रणवीर सिंग याचे करिअर चांगलेच आघाडीवर आहे. पद्मावत हा चित्रपट रणवीरच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला असे म्हटलं तर ...

Ranveer Singh releases on the day of the 83th World Cup team based on the film | रणवीर सिंगचा '८३'च्या वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपट होणार या दिवशी रिलीज

रणवीर सिंगचा '८३'च्या वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपट होणार या दिवशी रिलीज

googlenewsNext
्या रणवीर सिंग याचे करिअर चांगलेच आघाडीवर आहे. पद्मावत हा चित्रपट रणवीरच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.  पद्मावतनंतर रणवीरनेत जोया अख्तरच्या गली बॉय चित्रपटाची शूटिंग सुद्धा सुरु केली आहे. यानंतर रणवीर १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपटात झळकणार आहे. आधी हा चित्रपट 2019ला एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता मात्र आता त्याची रिलीज डेट 30 ऑगस्ट 2019 झाल्याचे समजते आहे. याबाबतची माहिती ट्विटरवरुन रिलायन्स इंटरटेन्मेंटने दिली आहे. यात रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करतो आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. तर रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. पहिल्यांदाच रणीवर कॅटरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे.  रणवीर सिंग या भूमिकेसाठी क्रिकेटचे धडे खुद्द कपिल देव यांच्याकडूनच घेणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजला १८१ धावांनी पराभूत करीत वर्ल्डकप जिंकला होता. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक होता. कपिल देव यांनी कर्णधारपद भूषविताना संघाचे संतुलनदेखील त्याकाळी योग्यरीत्या जमविले होते. शिवाय त्याकाळी ते क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले होते. कपिल देव यांनी १९७८ ते १९९४ दरम्यान भारतीय क्रिकेट संघात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे या चित्रपटात रणवीर सिंगला कपिल देव यांची भूमिका साकारणे खूपच चॅलेजिंग असणार आहे. 

ALSO READ : ‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

रणवीर सध्या गली बॉयच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘गली बॉय’ मध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. सध्या या  चित्रपटाचे शूटींग धडाक्यात सुरु आहे.  जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो अलीकडे लिक झाले  होते. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. या चित्रपटात आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Ranveer Singh releases on the day of the 83th World Cup team based on the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.