एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:56 IST2025-12-11T13:48:10+5:302025-12-11T13:56:35+5:30
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा सीरिज रिलीज होत असतात.

एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा
Ranveer Singh: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा सीरिज रिलीज होत असतात. यापैकी काही चित्रपट हे आधीज रिलीज झालेले असतात. तर काही सीरिज, सिनेमे थेट ओटीटीवर रिलीज केले जातात. त्यामुळे सिनेरसिकांची कल या प्लॅटफॉर्मकडे वाढत चालला आहे. त्यानुसार, प्रेक्षकांच्या पसंतीनुसार, नेटफ्लिक्स दर आठवड्याला सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या १० चित्रपटांची यादी जाहीर केली जाते. याचदरम्यान, एक आश्चर्य वाटेल अशी माहिती समोर आली आहे. एकीकडे रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, त्याचा १५ वर्षे जुना एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे.
या चित्रपटाचं नाव बॅंड बाजा बारात आहे. साल २०१० साली आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. या चित्रपटात रणवीर सिंगने बिट्टूची आणि अनुष्का शर्माने श्रुतीची भूमिका साकारली आहे. त्यावेळी या चित्रपटातील एका सीनमुळे मोठा वाद देखील निर्माण झाला होता. मनिष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने तेव्हा ९६ कोटींची कमाई केली. ज्याचं बजेट केवळ १५ कोटी इतकं होतं. अशातच एकीकडे रणवीरच्या धुरंधरची चर्चा असतानाच हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
रणवीर सिंग नव्हता पहिली पसंत...
बॅंड बाजा बारात या चित्रपटासाठी रणवीर सिंग ही पहिली पसंती नव्हता. ही भूमिका सुरुवातीला रणबीर कपूरला ऑफर करण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली. त्यानंतर या रोलसाठी रणवीरला विचारणा करण्यात आणि त्याचं नशीब फळफळलं.