'छावा','बाहुबली'ला धोबीपछाड! ३ तास ३४ मिनिटांच्या 'या' सिनेमाची जगभरात क्रेझ, तुम्ही बघितला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:38 IST2025-12-19T17:33:29+5:302025-12-19T17:38:06+5:30
२०२५ हे वर्ष बॉलिलवूडसाठी खास ठरलं आहे. अनेक चित्रपटांनी देशातच नव्हे तर जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे.

'छावा','बाहुबली'ला धोबीपछाड! ३ तास ३४ मिनिटांच्या 'या' सिनेमाची जगभरात क्रेझ, तुम्ही बघितला?
Dhurandhar Movie: गेल्या काही दिवसांपूर्वीच धुरंधर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या १४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व निर्माण केलं आहे. इतकंच नाहीतर या चित्रपटाने २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान पक्क केलं आहे. ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला सिने-रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
धुरंधर चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत आणि त्यांना मागे टाकले आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या व्यतिरिक्त, चित्रपटात इतरही अनेक मातब्बरकलाकार आहेत.'धुरंधर' हा आदित्य धरचा दुसरा चित्रपट; त्याचा मागील चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा जबरदस्त हिट होता. या चित्रपटात रणवीर सिंगसोबतअक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत.सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांमध्ये उत्तम प्रकारे काम केले आहे. आता चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, २२० ते २८० कोटी रुपये बजेटमध्ये बनलेला 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने १४व्या दिवशी अंदाजे २३ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २०७.२५ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या आठवड्यातील त्याची कमाई अंदाजे २५३ कोटी रुपये होती. तर धुरंधर देशभरात एकूण ४६०.४६ कोटींचा व्यवसाय केला आहे. भारतातासह जगभरातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने 'बाहुबली: द बिगिनिंग','छावा ''सुलतान' आणि 'जेलर' यांसारख्या चित्रपटांनाही मागे टाकत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.