दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा नवीन व्हिडीओ रिलीज; पण चाहत्यांची नाराजी, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:05 IST2025-10-20T14:05:14+5:302025-10-20T14:05:51+5:30
दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' टीमने एक नवीन व्हिडीओ शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे

दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा नवीन व्हिडीओ रिलीज; पण चाहत्यांची नाराजी, कारण...
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित प्रोजेक्ट 'रामायण'ची (Ramayana) सध्या चर्चा आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण' सिनेमाच्या टीमने एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून 'रामायण' सिनेमाबद्दलची उत्सुकता चाळवली गेली असली तरीही चाहत्यांनी मात्र 'रामायण'च्या नवीन व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घ्या सविस्तर
'रामायण'चा नवीन व्हिडीओ रिलीज, पण...
दिवाळीच्या मुहूर्तावर 'द वर्ल्ड ऑफ रामायण' (The World of Ramayana) या टीमने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मोशन व्हिडीओ शेअर केला. यात संपूर्ण पृथ्वी रामायणाने व्यापलेली पाहायला मिळतेय. या व्हिडीओत शेवटी चित्रपटाचे नाव 'रामायणम्' असं लिहिलेलं दिसतं. या पोस्टसह टीमने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ चांगला असला तरीही चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणत्याही कलाकाराचा 'लूक' किंवा 'टीझर' रिलीज न केल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.
#HappyDiwali 🏹 pic.twitter.com/mwsaplbjzP
— The World Of Ramayana (@WorldOfRamayana) October 20, 2025
अनेक चाहते सोशल मीडियावर कमेंट करून आपली निराशा व्यक्त करत आहेत. "आज दिवाळीचा इतका चांगला मुहूर्त होता, निदान एक पोस्टर तरी शेअर करायला पाहिजे होतं," अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. काही नाराज चाहत्यांनी तर रणबीर कपूरचा AI चा वापर करुन तयार केलेला लूक स्वतःच शेअर केला आणि आपली उत्सुकता दाखवली. काही युजर्सनी लिहिलं की, "आम्ही दिवाळी २०२६ पर्यंत वाट पाहू शकत नाही." अशाप्रकारे सिनेमाच्या टीमने मोशन व्हिडीओ रिलीज केला परंतु प्रमुख कलाकारांचा लूक शेअर न केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
चित्रपटाबद्दल अधिक माहिती
'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याचा पहिला भाग २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाला भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं जात आहे. चित्रपटाचे संगीत हंस जिमर आणि ए.आर. रहमान यांनी दिले आहे. रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण) आणि साउथ स्टार यश (रावण) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.