ठरलं! रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:02 PM2023-09-18T12:02:23+5:302023-09-18T12:02:51+5:30

Animal Movie : 'गदर २', 'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमांनंतर आता चाहते रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमासाठी उत्सुक आहेत. आता रणबीर कपूरच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

ranbir kapoor animal movie new poster film release on 1 december | ठरलं! रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

ठरलं! रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

googlenewsNext

बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूडचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'गदर २', 'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमांनंतर आता चाहते रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमासाठी उत्सुक आहेत. आता रणबीर कपूरच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर रणबीरचा राऊडी लूक पाहायला मिळत आहे. डोळ्याला गॉगल लावलेल्या रणबीरच्या तोंडात सिगारेट दिसत आहे. 'अ‍ॅनिमल' सिनेमाच्या या नव्या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरबरोबर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी माहितीसमोर आली आहे. 

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवशी म्हणजेच ३० सप्टेंबरला या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे.तर डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ डिसेंबरला रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. याबरोबरच बॉबी देओल, शक्ती कपूर, परिणीती चोप्रा हे कलाकारही झळकणार आहेत. 

Web Title: ranbir kapoor animal movie new poster film release on 1 december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.