मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:41 IST2025-12-19T09:40:00+5:302025-12-19T09:41:11+5:30
'धुरंधर'च्या ट्रेलर लाँचवेळी राकेश बेदींचा तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं होतं.

मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
'धुरंधर' सिनेमात जमील जमालीच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते राकेश बेदी काही दिवसांपूर्वी ट्रोल झाले. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी त्यांनी अभिनेत्री सारा अर्जुनला खांद्यावर किस केलं होतं. सिनेमात त्यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ऑनस्क्रीन लेकीला अशा प्रकारे किस केल्यावरुन त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. आता यावर ७१ वर्षीय राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या महिन्यात 'धुरंधर'चा ग्रँड ट्रेलर लाँच पार पडला होता. यावेळी स्टेजवर दिग्दर्शक आदित्य धर, रणवीर सिंह आणि इतर सर्व कलाकार होते. नंतर २० वर्षीय सारा अर्जुनलाही स्टेजवर बोलवण्यात आलं. तिने सर्वांची एकेक करुन भेट घेतली. ज्यावेळी ती राकेश बेदींजवळ आली तेव्हा त्यांनी तिची गळाभेट घेतली आणि तिच्या खांद्याला किस केलं. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. राकेश बेदींचं हे वर्तन नेटकऱ्यांना रुचलं नाही. अनेकांना ते किळसवाणंही वाटलं. आता त्यावर राकेश बेदींनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकांनी त्यांचं प्रेम चुकीच्या पद्धतीने बघितलं असं त्यांचं म्हणणं आहे. सेटवरही मी आणि सारा एकमेकांना प्रेमानेच भेटायचो त्यामुळे ट्रेलर लाँचची भेटही काही वेगळी नव्हती. फक्त ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने घेतली गेली असं ते म्हणाले.
This looks very creepy
byu/saurabhagarwal8 inBollyBlindsNGossip
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदींनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा खूपच वेडेपणा आहे. सारा माझ्या अर्ध्या वयाचीही नाही आणि ती माझ्या मुलीच्या भूमिकेत आहे. शूटिंगवेळी जेव्हाही आम्ही भेटायचो आम्ही एकमेकांची गळाभेट घ्यायचो. अगदी तसंच जसं एक मुलगी तिच्या वडिलांना भेटते. आमच्यात छान बाप-लेकीचा बाँड बनला होता जो पडद्यावरही दिसतो. त्यामुळे ट्रेलर लाँचवेळीही काही वेगळं घडलं नाही. एका वृद्ध व्यक्तीची तरुण मुलीबद्दल असलेली आपुलकी, स्नेह हे लोक पाहत नाहीयेत. आता बघणाऱ्याच्या नजरेतच दोष असेल तर काय करु शकतो."
ते पुढे असंही म्हणाले की, "मी सार्वजनिक ठिकाणी तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? तिचे आईवडीलही तिथे उपस्थित होते. लोक अशा प्रकारचे वेड्यासारखे दावे करत सुटतात. त्यांना फक्त सोशल मीडियावर विनाकारण काहीतरी मुद्दा बनवायचा असतो. मी सांगतोय की मी स्वत:चा बचाव करत नाहीये. मी खूप काम केलं आहे जे पाहून लोक प्रभावित झाले आहेत. नुकतंच मी मित्रांसोबत डिनरसाठी गेलो होतो आणि एक महिला माझ्याजवळ आली. तिचा मुलगा दिव्यांग आणि गतिमंद होता. त्याला माझं काम पाहून मजा येते असं महिलेने मला सांगितलं. माझ्यासाठी हीच सर्वात मोठी गोष्ट आहे."