कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादवने लढवली शक्कल; अभिनेत्याने केली मोठी घोषणा, चाहत्यांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:46 IST2026-02-28T13:42:33+5:302026-02-28T13:46:11+5:30

आपल्या अतरंगी विनोदी शैलीने आणि अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता राजपाल यादव नुकताच तिहार तुरुंगातून बाहेर आला. चेक बाऊन्स प्रकरणामुळे राजपाल यादवला तिहार तुरुंगात शिक्षा भोगावी लागली

Rajpal Yadav start his own youtube channel accounced on social media | कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादवने लढवली शक्कल; अभिनेत्याने केली मोठी घोषणा, चाहत्यांना केलं आवाहन

कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादवने लढवली शक्कल; अभिनेत्याने केली मोठी घोषणा, चाहत्यांना केलं आवाहन

आपल्या अतरंगी विनोदी शैलीने आणि अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता राजपाल यादव नुकताच तिहार तुरुंगातून बाहेर आला. चेक बाऊन्स प्रकरणामुळे राजपाल यादवला तिहार तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. पुढे काही पैसे भरुन राजपालला सध्या तात्पुरता जामीन मिळाला आहे. अशातच कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादवने चांगलीच शक्कल लढवली आहे. 

राजपाल यादव आता डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजपालने स्वतःचे अधिकृत यूट्यूब चॅनल लॉन्च केले असून, या माध्यमातून तो आता थेट आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, राजपाल यादवने आता बदलत्या काळाची पावले ओळखून डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला आहे.




या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजपाल यादव त्याच्या चित्रपटांमागील मजेशीर किस्से, वैयक्तिक आयुष्यातील काही खास पैलू आणि नवीन उपक्रम चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. राजपाल यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजपाल यादवला उत्पन्नाचा मोठा स्त्रोत निर्माण होऊन त्याला उर्वरीत कर्ज फेडण्यास मदत होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.

काय असेल चॅनलवर खास?

राजपाल यादवने चॅनल लॉन्च करताना सांगितले की, "आजच्या काळात डिजिटल माध्यम हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. मला अनेकदा विचारले जाते की माझ्या प्रसिद्ध भूमिकांमागे काय कथा होती, किंवा मी रोजच्या आयुष्यात कसा आहे. आता या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करेन." त्यांच्या चॅनलवर व्लॉग्स, कॉमेडी स्किट्स आणि पडद्यामागचे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

Web Title : कर्ज चुकाने के लिए राजपाल यादव ने लॉन्च किया यूट्यूब चैनल, प्रशंसकों से अपील

Web Summary : राजपाल यादव ने कर्ज चुकाने के लिए यूट्यूब चैनल लॉन्च किया। उनका उद्देश्य प्रशंसकों से जुड़ना, फिल्म के किस्से और व्यक्तिगत कहानियां साझा करना है, जिससे उन्हें वित्तीय मदद मिलने की उम्मीद है।

Web Title : Rajpal Yadav launches YouTube channel to repay debt, appeals to fans.

Web Summary : Rajpal Yadav, after temporary bail, launches a YouTube channel to repay debt. He aims to connect with fans, sharing film anecdotes and personal stories via vlogs and comedy, hoping for financial support.