पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर 9 वर्षे लहान राधासोबत राजपाल यादवने केलं दुसरं लग्न, कॅनडात झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:50 PM2021-03-16T15:50:30+5:302021-03-16T16:06:13+5:30

10 जून 2003 रोजी राजपालने दुसरे लग्न केलं.

Rajpal yadav birthday special his love story with radha | पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर 9 वर्षे लहान राधासोबत राजपाल यादवने केलं दुसरं लग्न, कॅनडात झाली होती पहिली भेट

पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर 9 वर्षे लहान राधासोबत राजपाल यादवने केलं दुसरं लग्न, कॅनडात झाली होती पहिली भेट

googlenewsNext

राजपाल यादव आज आपला वाढदिवस साजरा करतो आहे. राजपाल यादवने आपल्या भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांचे खूप मनोरंजन केलं आहे. एकवेळ अशी होती जेव्हा या अभिनेत्याच्या नावानेच सिनेमा हिट व्हायचे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या-छोट्या भूमिकांमधून केली होती. राजपाल यादव खरी ओळख मिळाली ती राम गोपाल वर्माच्या जंगल (2000) या चित्रपटाद्वारे.  राजपालच्या वाढदिवशी आज आम्ही तुम्हाला त्याची लव्हस्टोरी सांगणार आहोत.  

10 जून 2003 रोजी राजपालने दुसरे लग्न केलं. राधा ही राजपालची दुसरी पत्नी आहे. 'हिरो' सिनेमाच्या शूटिंगसाठी राजपाल कॅनडाला गेला होता. त्यावेळी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राजपाल आणि राधाची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. दोघांच्या उंचीत दोन इंचाचा फरक आहे. असं असूनही त्यांच्यात घट्ट बॉन्डिंग तयार झालं. तसेच 10 दिवस राजपाल कॅनडात होता मात्र या दिवसांत या दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री झाली की, दोघांना ते दोघे 10 दिवसांपासून नाही तर गेल्या 10 वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्यासारखे वाटू लागले.


राजपाल जेव्हा मुंबईत परतला तेव्हाही तो राधासह 10 महिने संपर्कात होता. दोघांची वाढती जवळीक पाहता राधानेही मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि सगळं सोडून ती मुंबईत केवळ राजपालच्या प्रेमामुळे स्थायिक झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.


राधाचा जन्म हा कॅनडात झाला असला तरी तिला भारतीय संस्कृतीबाबत एक वेगळेच प्रेम आहे. तिने नेहमीच पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीलाच जास्त प्राधन्य दिले.त्यामुळेच मुंबईत स्थायिक होण्याच्या निर्णयावर तिने जराही विलंब न लावता कॅनडा सोडून मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला.


राधा मुंबईत पहिल्यांदा आली तेव्हा राजपालनं तिला खास सरप्राईज दिलं होतं. तिला इंम्प्रेस करण्यासाठी राजपालनं खास तयारी केली होती. त्याने घराचं इंटिरिअर खास पद्धतीने तयार केले होते. कॅनडातील ज्या हॉटेलमध्ये दोघांची पहिली भेट झाली त्या रुमप्रमाणे राजपालने आपल्या घराचे इंटिरिअर केले होते. 


 

Web Title: Rajpal yadav birthday special his love story with radha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.