Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 18:23 IST2022-10-12T18:22:58+5:302022-10-12T18:23:32+5:30
‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) येतोय. या चित्रपटातही एक आयटम सॉन्ग पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. या आयटम सॉन्गमध्ये कुणाची वर्णी लागणार?

Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री
अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाण्यांनीही सर्वांना वेड लावलं होतं. सामंथा रूथ प्रभुचं (Samantha Ruth Prabhu) ‘ऊं अंटावा’ हे आयटम सॉन्गही तुफान लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात सामंथाचा सिजलिंग अवतार पाहून सगळेच थक्क झाले होते. आता ‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) येतोय. या चित्रपटातही एक तडक-भडक आयटम सॉन्ग पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. आता या आयटम सॉन्गमध्ये कुणाची वर्णी लागणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आता या गाण्यासाठी एक दोन नाही तर तीन तीन अभिनेत्रींची नावं चर्चेत आहेत. जी अभिनेत्री आयटम सॉन्ग करेल, तिची चित्रपटातही महत्त्वाची भूमिका असणार असल्याचं कळतंय.
‘ऊं अंटावा’नंतर ‘पुष्पा 2’मध्येही सामंथा प्रभुची वर्णी लागणार अशी चर्चा होती. यानंतर ‘पुष्पा 2’मधील आयटम सॉन्गसाठी नोरा फतेहीचं ( Nora Fatehi) नाव चर्चेत आलं. आता आणखी एका अभिनेत्रींच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर सामंथा व नोरा नव्हे तर तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ‘पुष्पा 2’मधील आयटम सॉन्गवर थिरकताना दिसणार आहे.
अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु तमन्ना अल्लू अर्जुन व दिग्दर्शक सुकुमारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळतेय. आता खरं काय ते लवकर कळेलच.
सामंथाच्या ‘ऊं अंटावा’ गाण्यानं चांगलीच हवा केली होती. सामंथा व अल्लूवर चित्रीत या गाण्यानं लोकांना वेड लावलं होतं. ‘पुष्पा 2’बद्दल सांगायचं तर चित्रपटाचं शूटींग सुरू झालं आहे. या चित्रपटाचा बजेट 500 कोटी असल्याचं कळतंय. दुसºया पार्टमध्येही अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल हीच स्टारकास्ट दिसणार आहे.