Parineeti Chopra-Raghav Chadha : मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती चोप्रा; वेडिंग आऊटफिटच्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:01 IST2023-03-27T10:59:42+5:302023-03-27T11:01:55+5:30
परिणीती आणि आम आदमी पार्टी नेता राघव चड्डा हे काही दिवसांपूर्वीच आधी लंच आणि नंतर डिनर डेटसाठी एकत्र आले.

Parineeti Chopra-Raghav Chadha : मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती चोप्रा; वेडिंग आऊटफिटच्या चर्चांना उधाण
बॉलिवूडची बबली गर्ल अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. चुपके चुपके लंच आणि डिनर डेटमुळे ती प्रकाशझोतात आली आहे. आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्डासोबत (Raghav Chadha) तिला दोन वेळा रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिले गेले आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. आता तर परिणीती प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) घरी पोहोचल्याने तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
परिणीती आणि राघव चड्डा हे काही दिवसांपूर्वीच आधी लंच आणि नंतर डिनर डेटसाठी एकत्र आले. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर दोघांना पापाराझींनी गाठलं. सर्व कॅमेरे त्या दोघांवर होते. झालं तर यानंतर थेट दोघांच्या लग्नाच्या चर्चांनाच उधाण आले. नुकताच परिणीतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती मनीष मल्होत्राच्या घरी जाताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वनपीस, हाय हील्स आणि हातात छोटी बॅग अशा लुकमध्ये परिणीती फ्रेश दिसत आहे. जाताना ती कॅमेऱ्यासमोर छान पोझ देते, स्माईलही करते. यामध्ये परिणीती खूपच आनंदात दिसत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओनंतर आता एकच चर्चा होत आहे. परिणीती वेडिंग आऊटफिटसाठीच मनीषला भेटायला पोहोचली आहे. लवकरच परिणीती आणि राघव यांचा रोका होणार आहे या चर्चांना आता उधाण आलं आहे. तर दुसरीकडे 'प्लीज गुलाबी रंगाचा लेहेंगा नको' अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एकाने कमेंट करत लिहिले, 'आशा आहे वेडिंगसाठी मनीषचा लेहेंगा नसेल. त्याचे वेडिंग आऊटफिट अजिबात चांगले नसतात.
काही दिवसांपूर्वीच संसदच्या बाहेर एका पत्रकाराने राघव तड्डा यांना परिणीतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते हसतच म्हणाले, 'राजनीती वर प्रश्न विचारा परिणीतीवर नाही.' अद्याप दोघांकडूनही या चर्चांवर स्पष्टीकरण आलेले नाही मात्र परिणीतीच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळंच सांगून जातोय. विशेष म्हणजे परिणीती आणि राघव हे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथे एकत्रच शिकले आहेत.