आकांक्षा दुबेनंतर आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या, नातेवाईकाच्या घरीच घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:46 IST2023-03-28T13:45:25+5:302023-03-28T13:46:27+5:30
मनोरंजनविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आकांक्षा दुबेनंतर आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या, नातेवाईकाच्या घरीच घेतला गळफास
मनोरंजनविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. आता आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ओडिसाची अभिनेत्री रुचिस्मिता गुरु (Ruchismita Guru) हिचा मृतदेह आढळून आला आहे.रुचिस्मिता नातेवाईकाच्या घरी असता तिथेच तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
माध्यम रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचा मृतदेह एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. रुचिस्मिता बलांगीर शहरातील तलपालीपाडा येथे राहणारी होती. सुडापाडा येथे ती आपल्या मामाच्या घरी राहायला गेली होती. तिने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. तसेच ती गायिका म्हणूनही प्रसिद्ध होती. तिने अनेक स्टेज शो केले होते.
रुचिस्मिताचा मृतदेह आढळून येताच नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसा नातेवाईकांची चौकशी करत आहेत. रुचिस्मिताचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजूनही अस्पष्ट आहे. तिने आत्महत्या केली तर का केली अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. तिच्या कुटुंबाने तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
Akanksha Dubey : शॉकिंग! भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेलमध्ये घेतला गळफास
काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनेही आत्महत्या केली. ती केवळ २५ वर्षांची होती. आकांक्षाने एका हॉटेलमध्येच गळफास लावत आत्महत्येचे पाऊल उचलले. त