Akanksha Dubey : शॉकिंग! भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेलमध्ये घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 01:16 PM2023-03-26T13:16:02+5:302023-03-26T13:31:28+5:30

Akanksha Dubey committed suicide : काल २५ मार्चला शूटनंतर आकांक्षा दुबे हॉटेलात गेली आणि तिथेच तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येच्या बातमीने भाेजपुरी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

Shocking, Bhojpuri actress Akanksha Dubey committed suicide, hanged herself in a hotel | Akanksha Dubey : शॉकिंग! भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेलमध्ये घेतला गळफास

Akanksha Dubey : शॉकिंग! भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेलमध्ये घेतला गळफास

googlenewsNext

भोजपुरी (Bhojpuri) इंडस्ट्रीतून एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey)  हिने  वाराणसीमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये आकांक्षाने गळफास घेतला. ती 25 वर्षांची होती.
काल २५ मार्चला शूटनंतर ती हॉटेलात गेली आणि तिथेच तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येच्या बातमीने भाेजपुरी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

आकांक्षा वाराणसी येथे एका प्रोजेक्टच्या शूटींगसाठी गेली होती. याचदरम्यान तिने आत्महत्या केली. अद्याप तिच्या आत्महत्येमागच्या कारणांचा खुलासा झालेला नाही.
आकांक्षाने २०१९ मध्ये मेरी जंग मेरा फैसला या सिनेमातून ॲक्टिंग करिअरला सुरूवात केली होती. यात तिचा कॅमिओ रोल होता. भूमिका लहान होती, पण आकांक्षाच्या या भूमिकेचं अपार कौतुक झालं होतं. यानंतर मुझसे शादी करोगी व साजन असे अनेक हिट भोजपुरी सिनेमे तिने दिलेत.

आकांक्षा तीन वर्षांची असताना पालकांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिने आयपीएस अधिकार व्हावं, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. पण तिला बालपणापासून डान्स आणि ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता. तिचं हेच पॅशन तिला फिल्मी दुनियेत घेऊन आलं. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने फिल्मी करिअर सुरू केलं. वयाच्या १७ व्या वर्षी आकांक्षाने भोजपुरी दुनियेत पाऊल ठेवलं. अर्थात करिअरच्या सुरूवातीला तिला अनेक नकारपचवावे लागले होते.
२०१८ साली आकांक्षा डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर ती फिल्मी दुनियेपासून काही काळ दूर गेली होती. मात्र काही काळानंतर तिने पुन्हा कमबॅक केलं होतं. आपल्या कमबॅकचं श्रेय तिने तिच्या आईला दिलं होतं. भोजपुरी सिनेमांशिवाय तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलं. २०२१ मध्ये तिचं तुम जवान हम लाइका हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं होतं.

 

आकांक्षाच्या आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. 'ये आरा कभी हरा नहीं' असे या गाण्याचे शीर्षक आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसतेय. जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंगसोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते.

Web Title: Shocking, Bhojpuri actress Akanksha Dubey committed suicide, hanged herself in a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.