'भारत-पाकिस्तान संबंध सुधारु शकतात, फक्त राजकीय..'; सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 03:15 PM2023-07-27T15:15:34+5:302023-07-27T15:17:28+5:30

Sunny deol:२२ वर्षानंतर 'गदर'चा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे. कारगिल विजय दिवसाचं निमित्त साधत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

on-gadar-2-trailer-launch-sunny-deol-statement-on-india-pakistan-relation | 'भारत-पाकिस्तान संबंध सुधारु शकतात, फक्त राजकीय..'; सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

'भारत-पाकिस्तान संबंध सुधारु शकतात, फक्त राजकीय..'; सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

googlenewsNext

भारताचा तारासिंग आणि पाकिस्तानची सकिना यांची प्रेमकहानी हळुवारपणे उलगडत जाणार 'गदर' (gadar) २२ वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. या सिनेमाला मिळालेलं प्रेम पाहून लवकरच त्याचा दुसरा पार्ट 'गदर 2'  (gadar 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. यामध्येच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. विशेष म्हणजे या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात अभिनेता सनी देओलने (Sunny deol) भारत-पाकिस्तान संबंधांवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

२२ वर्षानंतर 'गदर'चा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कारगिल विजय दिवसाचं निमित्त साधत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. गदर या सिनेमामध्ये भारत-पाकिस्तानमधील संघर्ष दाखवण्यात आला होता. त्यामुळे आता ‘गदर 2’ चित्रपटाची कथा सुद्धा त्याच अंगाने पुढे जाणारी आहे. ट्रेलर लॉन्च होत असताना सनी देओलने भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केलं. ज्यामुळे उपस्थितांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.

काय म्हणाला सनी देओल?

"मानवतेमध्येच सारं काही आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूला प्रेम आहे. त्यामुळे हे संबंध सुधरु शकतात. पण, राजकीय खेळामुळे द्वेष निर्माण होत आहे. या सिनेमामध्येही तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे. आपण परस्परांशी भांडू नये", अशीच लोकांची इच्छा असते, असं सनी देओल म्हणाला.

दरम्यान, सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुखेय भूमिका असलेला हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा OMG 2 हा रिलीज होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकमेकाच्या आमनेसामने येणार आहेत.
 

Web Title: on-gadar-2-trailer-launch-sunny-deol-statement-on-india-pakistan-relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.