Video: पहिला सिनेमा ते RRR!! ज्युनिअर एनटीआरचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:52 IST2022-04-12T13:52:12+5:302022-04-12T13:52:47+5:30
Junior NTR: फिटनेस सांभाळणं NTRसाठी सोपं नव्हतं. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.

Video: पहिला सिनेमा ते RRR!! ज्युनिअर एनटीआरचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल अवाक्
गेल्या काही काळापासून अनेक दाक्षिणात्य सिनेमा बॉलिवूड चित्रपटांवर मात करताना दिसत आहेत. पुष्पा, RRR या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना धोबीपछाड केलं. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये साऊथचे सिनेमा आणि त्यातील कलाकारांची तुफान क्रेझ आहे. यामध्येच RRR आणि त्यात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता jr. NTR याची विशेष चलती असल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटात त्याने अभिनयासोबत फिटनेसमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, हा फिटनेस सांभाळणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.
सध्या फिटनेसमुळे आणि अभिनयामुळे jr. NTR विशेष लोकप्रिय होत आहे. यात खासकरुन तरुणींमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे. मात्र, एकेकाळी jr. NTR प्रचंड वेगळा दिसायचा. थोडक्यात. फिटनेस म्हणजे काय? हेदेखील त्याला माहित नसावं हे त्याच्या पूर्वीच्या फोटोंवरुन लक्षात येतं. सोशल मीडियावर jr. NTR च्या पहिल्या चित्रपटातील फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोतील त्याचा लूक आणि RRR मधील लूक यांच्यात जमीन आस्मानाचा फरक असल्याचं पाहायला मिळतं.
नवरा सुपरस्टार असूनही ज्युनिअर NTR ची पत्नी राहते प्रचंड साधी; फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तो फॉर्मल लूकमध्ये असून त्याचं वजन प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. तसंच तो एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच दिसत आहे. मात्र, RRR मध्ये त्याने कमालीचं ट्रान्सफर्मेशन केलं आहे.
गेल्या काही वर्षात फिटनेसवर दिला जोर
३८ वर्षीय एनटीआर गेल्या काही काळापासून फिटनेस फ्रीक झाला आहे. त्यामुळे तो डाएट, वर्कआऊट यांवर जास्तीत जास्त भर देत आहे. त्याच्या याच महेनतीचं फळ RRR मध्ये दिसून येत आहे.
एनटीआरचे गाजलेले सिनेमा
स्टूडेंट नंबर वन आदी , सिम्हाद्री, राखी, यमडोंगा, अधुर्स, बृंदाबनम, टेम्पर, नन्नाकू प्रेमातो, जनता गॅराज, जय लव कुश, अरविंद समेता वीर राघव त्याचे हे चित्रपट विशेष गाजले आहेत.