आता असा दिसतो करिष्मा कपूरचा हीरो; आईच्या निधनानंतर झाला इंडस्ट्रीतून गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 19:43 IST2017-11-09T14:13:50+5:302017-11-09T19:43:50+5:30
हरीश कुमार बॉलिवूडमध्ये त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी ९० च्या दशकात आपली छाप सोडली होती. मात्र त्यानंतर हरीश कुमार ...

आता असा दिसतो करिष्मा कपूरचा हीरो; आईच्या निधनानंतर झाला इंडस्ट्रीतून गायब!
ह ीश कुमार बॉलिवूडमध्ये त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी ९० च्या दशकात आपली छाप सोडली होती. मात्र त्यानंतर हरीश कुमार जणूकाही इंडस्ट्रीमधून गायबच झाला. हरिशने त्याच्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. हिंदी, तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणारा हरीश एकमेव अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड प्रादेशिक भाषेतील तब्बल ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
![]()
हरिशने त्याच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. असे म्हटले जाते की, ‘हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करणारा हरीश एकमेव आहे. त्याने बॉलिवूड आणि प्रादेशिक भाषांमधील तीनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हरीश कुमारने वयाच्या पंधराव्या वर्षीच मुख्य अभिनेता म्हणून काम केले. मल्याळम भाषेतील ‘डेजी’ हा त्याचा पहिला चित्रपट होता.
![]()
![]()
पुढे हरीश कुमारने अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्या ‘प्रेम कैदी’ (१९९१) या बॉलिवूड डेब्यू चित्रपटामध्ये लीड अॅक्टर म्हणून काम केले. या अगोदर त्याने बॉलिवूडमधील ‘संसार’ आणि ‘जीवनधारा’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. हरीशने नाना पाटेकरच्या ‘तिरंगा’ आणि गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. एकूणच ९० च्या दशकात हरीशने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. परंतु २००१ मध्ये आईच्या निधनानंतर त्याने पडद्यावरून एक्झिट घेतली.
![]()
![]()
२०११ मध्ये त्याने गोविंदा स्टारर ‘नॉट एट ४०’मधून वापसी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. अखेरीस २०१२ मध्ये आलेल्या ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटात तो झळकला होता. परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. असे म्हटले जात आहे की, हरीश कुमार त्याच्या वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. तसेच याच कारणामुळे त्याला काम मिळणेही बंद झाले आहे. बॉलिवूडबरोबर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्येही त्याला संधी मिळणे आता जवळपास बंद झाले आहे. परंतु वास्तव काय हे हरीश कुमारच सांगू शकेल.