महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:02 IST2022-07-05T16:59:38+5:302022-07-05T17:02:34+5:30
Nora fatehi: या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते.

महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यात अनेकदा तिच्या बोल्ड लूक वा डान्सची चर्चा रंगताना दिसते. मात्र, यावेळी सिक्युरिटी गार्डसोबत चुकीचं वर्तन केल्यामुळे नोरा ट्रोल झाली आहे. सध्या सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मानव मंगलानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केलं आहे.
काय म्हणाले नेटकरी?
'कपडे तुझे आणि सांभाळणार दुसरा', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 'तर, तुला जराही लाज वाटत नाही का त्याच्यासोबत असं वागताना?', 'हिचा ड्रेस वाचवण्यासाठी तो बिचारा सगळा भिजला आहे', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ डान्स दीवाने ज्युनिअर्सच्या सेटवरील आहे.सध्या नोरा या शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. तसंच लवकरच ती अजय देवगणसोबत थँक गॉड या चित्रपटात झळकणार आहे.