नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 08:44 IST2025-12-21T08:43:47+5:302025-12-21T08:44:07+5:30

नोरा फतेहीचा मुंबईत भीषण अपघात झाला असून मद्यधुंद चालकाने अभिनेत्रीच्या कारला जोरदार धडक दिली आहे. नेमकं काय घडलं?

Nora Fatehi car met with an accident in Mumbai Drunk driver hit her how is the actress's condition? | नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?

नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?

बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही हिच्या कारचा शनिवारी मुंबईत भीषण अपघात झाला. 'सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी जात असताना एका मद्यधुंद कार चालकाने नोराच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातातनोरा फतेही सुदैवाने बचावली असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नेमकी घटना काय?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नोरा फतेही आपल्या कारने सनबर्न फेस्टिव्हलकडे जात होती. त्याच वेळी एका भरधाव कारने तिच्या गाडीला धडक दिली. धडक देणारा चालक नशेत असल्याची प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातानंतर नोराला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे घोषित केले आहे.


मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंग (वेगाने गाडी चालवणे) आणि मद्यपान करून वाहन चालवणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या अपघातातून सावरल्यानंतर नोरा फतेहीने दिलेला शब्द पाळत 'सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये आपला परफॉर्मन्स रद्द केला नाही. तिने ठरल्याप्रमाणे स्टेजवर सादरीकरण केले. कामाप्रती असलेल्या तिच्या प्रेमाचं यामुळे कौतुक होतंय.

Web Title : नोरा फतेही की कार का मुंबई में एक्सीडेंट; नशे में चालक ने मारी टक्कर, वह सुरक्षित।

Web Summary : मुंबई में सनबर्न फेस्टिवल जाते समय नोरा फतेही की कार को एक नशे में धुत ड्राइवर ने टक्कर मार दी। सौभाग्य से, वह बिना चोट के बच गईं और उनका तुरंत इलाज किया गया। पुलिस ने ड्राइवर को गिरफ्तार कर लिया, और नोरा ने फिर भी फेस्टिवल में प्रस्तुति दी।

Web Title : Nora Fatehi's car accident in Mumbai; drunk driver hits, she's safe.

Web Summary : Nora Fatehi's car was hit by a drunk driver in Mumbai while en route to Sunburn Festival. Fortunately, she escaped uninjured and was quickly treated. Police arrested the driver, and Nora still performed at the festival.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.