Nora Fatehi च्या मदहोश डोळ्यांवर खिळली सर्वांची नजर, सादगी बघून फॅन्स म्हणाले - माशाअल्लाह...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 18:29 IST2021-12-04T18:27:18+5:302021-12-04T18:29:18+5:30
Nora Fatehi : नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बघून तिच्या नजरेवरच फॅन्स नजर खिळली आहे. नोराने अबुधाबीतील मशिदीतील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi च्या मदहोश डोळ्यांवर खिळली सर्वांची नजर, सादगी बघून फॅन्स म्हणाले - माशाअल्लाह...!
नोरा फतेही (Nora fatehi) सध्या कामासंदर्भात अबुधाबीमध्ये आहे. ती तिथे Vidcon इव्हेंटमध्ये परफॉर्म करत आहे. त्याचे व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओशिवाय नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बघून तिच्या नजरेवरच फॅन्स नजर खिळली आहे. नोराने अबुधाबीतील (Abudhabi) मशिदीतील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
नोराने मशिदीच्या समोर हे फोटो काढले आहेत. नोराचे काजळ लावलेले डोळे तिच्या सौंदर्याचं गुपित सांगत आहेत. नोराने डोळ्यांना काजळ आणि मस्कारा लावला आहे. नोराने आय मेकअप प्लॉन्ट करत एक क्लोजअप फोटोही शेअर केला आहे. तिच्या या अनुभवाला नोराने सुंदर म्हटलं आहे.
नोराच्या या खास आणि वेगळ्या लूकचं तिचे फॅन्स तर भरभरून कौतुक तर करत आहेतच, सोबतच अनेक सेलिब्रिटीही नोराच्या मदहोश डोळ्यांचं कौतुक करत आहे. नर्गीस फाखरीने तिला गॉर्जिअस अशी कमेंट दिली आहे. फॅन्सची तर तिच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यांवरून नजर हटत नाहीय.
नोराने येथील इव्हेंटमधील तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओही शेअर केले आहेत. रेड ड्रेसमध्ये नोरा अप्सरासारखीच दिसत आहे. तिने या इव्हेंटमध्ये साकी साकी, हाय गर्मी अशा तिच्या काही सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केलं आहे. प्रेक्षकही तिचा डान्स एन्जॉय करताना आणि तिला चिअर करताना व्हिडीओत दिसत आहे.