पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:25 IST2026-02-03T14:22:53+5:302026-02-03T14:25:29+5:30

शबाना आझमींचं बोलणं मध्येच थांबवलं अन्...; दिलीपच्या वर्तनावर भडकले नेटकरी, फराह खानच्या नवीन व्हिडीओत काय घडलं?

Netizens are slam with farah khan cook Dilip for the first time video viral | पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे (Vlogs) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिच्या व्लॉग्समध्ये ती अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्या खासगी आयुष्याची झलक चाहत्यांना दाखवते. मात्र, तिच्या नव्या व्लॉगमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत असून, फराहचा कुक दिलीप याच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी फराहने एक नवीन व्लॉग शेअर केला, ज्यामध्ये ती खंडाळा येथील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या 'सुकून' या बंगल्यात पोहोचली. या व्हिडिओमध्ये बंगल्यातील सुंदर गार्डन, दुर्मिळ अँटीक वस्तू आणि निसर्गरम्य परिसर दाखवण्यात आला आहे. शबाना यांनी त्यांच्या ४१ वर्षांच्या वैवाहिक प्रवासाबद्दल आणि १५ वर्ष जुन्या बंगल्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या.

फराहच्या प्रत्येक व्लॉगमध्ये तिचा कुक दिलीप नेहमी तिच्या सोबत असतो. मात्र, या व्लॉगमध्ये दिलीप सातत्याने मध्येमध्ये येत असल्याने आणि त्याच्या 'ओव्हर ॲक्टिंग'मुळे प्रेक्षक चिडले आहेत. विशेषतः जेव्हा शबाना आझमी एका १५० वर्षे जुन्या झाडाबद्दल महत्त्वाची माहिती देत होत्या, तेव्हा दिलीप मध्येच आला. त्याने शबाना यांचं बोलणं तोडलं आणि म्हणाला, "मॅम, हे झाड तुमच्यापेक्षाही जुने आहे." मोठ्या कलाकारांसोबत वागण्याची दिलीपची ही पद्धत अनेक चाहत्यांना खटकली आहे.

यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांनी आपला राग व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, "आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप खूपच त्रासदायक (Irrirating) वाटला. अशाने तुम्ही तुमचे प्रेक्षक गमावाल." दुसऱ्याने कमेंट केली, "दिलीपचे सीन्स कमी करा, तो खूप मध्ये मध्ये बोलतो. आम्हाला सेलिब्रिटींना ऐकायचे असते, तुमच्या कुकला नाही.", अशा कमेंट करत लोकांनी दिलीपवर नाराजी व्यक्त केली.

एप्रिल २०२४ मध्ये फराहने तिचे यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. तिच्या व्लॉग्समध्ये आतापर्यंत अर्जुन कपूर, शिल्पा शेट्टी, करण जोहर आणि अनन्या पांडे यांसारख्या अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली आहे. तिचे व्लॉग्स खूप लोकप्रिय आहेत, परंतु यावेळी दिलीपच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्याला पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

Web Title : जावेद अख्तर के वीडियो में फराह खान के कुक दिलीप की आलोचना।

Web Summary : जावेद अख्तर और शबाना आज़मी के घर पर फराह खान के व्लॉग की आलोचना हुई। दर्शकों को दिलीप का हस्तक्षेप पसंद नहीं आया, खासकर शबाना की कहानियों के दौरान, जिससे उनके व्यवहार पर नकारात्मक टिप्पणियां आईं।

Web Title : Farah Khan's cook, Dilip, faces backlash in new video.

Web Summary : Farah Khan's vlog at Javed Akhtar and Shabana Azmi's home sparked criticism. Viewers found her cook, Dilip, disruptive and attention-seeking, especially during Shabana's stories, leading to negative comments about his behavior.