ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:35 IST2025-12-24T11:33:55+5:302025-12-24T11:35:59+5:30
Dhurandhar Movie : 'धुरंधर' हा भारतातील इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा!
'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाई-थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता १९ दिवस झाले असून, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. याचसोबत 'धुरंधर' हा भारतातील इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात २१८ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या आठवड्यात २६१.६५ कोटी रुपये. तर तिसऱ्या आठवड्यात ९९.७० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. १८ व्या दिवशी सिनेमाने एकूण ५९८.९० कोटी रुपये. १९ व्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत १७.२५ कोटींची कमाई केली होती. भारतात एकूण ६१६.१५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं.
मोठ्या चित्रपटांचं रेकॉर्ड मोडले
'धुरंधर'ने ६०० कोटींचा टप्पा पार करून नवा इतिहास रचला आहे. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने जवान, छावा आणि स्त्री २ यांचे 'लाईफटाइम कलेक्शन' मागे टाकले आहे. यामुळे 'धुरंधर' हा भारताचा सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे. तसेच, भारताचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर अजूनही 'पुष्पा २'चे राज्य कायम आहे, ज्याने ८१२.१४ कोटींची कमाई केली होती.
या ब्लॉकबस्टर चित्रपटांना टाकलं मागे
१. स्त्री २: ५९७.९९ कोटी रुपये
२. छावा: ५८५.७ कोटी रुपये
३. जवान: ५८२.३१ कोटी रुपये
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तर अक्षय खन्नाने 'रहमान डकैत'च्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. याशिवाय अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि राकेश बेदी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.