'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:16 IST2025-05-30T14:16:03+5:302025-05-30T14:16:26+5:30

नाना पाटेकरांची भूमिका असलेल्या 'हाउसफुल्ल ५' मधील नवीन गाणं समोर आलं असून नानांचा खास फुगडी डान्स व्हायरल झाला आहे. बातमीवर क्लिक करुन बघा व्हिडीओ

nana patekar The Phoogdi Dance video viral housefull 5 movie akshay kumar riteish deshmukh | 'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर

'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर

'हाउसफुल्ल ५' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी 'हाउसफुल्ल ५' चा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलरमध्ये दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींची झलक बघायला मिळाली. 'हाउसफुल्ल ५'च्या ट्रेलरमध्ये विशेष आकर्षण होतं ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. अनेक वर्षांनी नाना मल्टिस्टारर बिग बजेट बॉलिवूड सिनेमात दिसणार आहेत. नुकतंच 'हाउसफुल्ल ५' सिनेमातील गाण्याचा एक टीझर शेअर करण्यात आलाय. या टीझरमध्ये नाना सर्वांसोबत फुगडी घालताना दिसत आहेत.

'हाउसफुल्ल ५'मधील नवं गाणं

नाना पाटेकरांवर चित्रीत झालेल्या 'हाउसफुल्ल ५'मधील नवीन गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. 'द फुगडी डान्स' असं या गाण्याचं नाव आहे. 'फू बाई फू, फुगडी फू..' हे मराठी शब्द या गाण्याच्या सुरुवातीला ऐकायला कळतात. कपाळावर पिवळा भंडारा, हातात वाद्य असा नानांचा मराठमोळा अवतार दिसतो. पुढे याच गाण्यात नानांसोबत अक्षय कुमार, नर्गिस फाखरी, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडीस फुगडी घालताना दिसतात. नानांचा हटके अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हे संपूर्ण गाणं उद्या रिलीज होणार आहे.

कधी रिलीज होणार 'हाउसफुल्ल ५'?

'हाउसफुल्ल ५' सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. या सिनेमात लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. सिनेमात नाना पाटेकरअक्षय कुमारचंकी पांडे, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, जॅकलीन फर्नांडीस, डिनो मोरिया, अभिषेक बच्चन हे कलाकार दिसणार आहेत. साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ६ जून रोजी 'हाउसफुल्ल ५' सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: nana patekar The Phoogdi Dance video viral housefull 5 movie akshay kumar riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.