कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:03 IST2025-08-06T13:02:58+5:302025-08-06T13:03:28+5:30
'त्या' सिनेमाची पार्टी, धनुषसोबत मृणालही दिसली

कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
सध्या बीटाऊनमध्ये धनुष (Dhanush) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हॉट टॉपिक आहेत. दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा रंगली आहे. 'सन ऑफ सरदार २' सिनेमाच्या स्क्रीनिंगला धनुष आणि मृणालमध्ये जवळीक पाहून चर्चांना उधाण आलं. काल दिवसभर केवळ हीच चर्चा होती. मात्र धनुष आणि मृणालची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली?
अनेक मीडिया रिपोर्ट्सने मृणाल आणि धनुषच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं आहे. रिलेशनशिप नवीन असल्याने सध्या दोघांनाही ते जाहीर करायचं नसल्याने ते यावर बोलणार नाहीत असंही समजतंय. सध्या दोघांचाही मित्रपरिवार त्यांच्या एकत्र येण्याने खूप खूश आहे. दोघांचे विचार, मूल्ये एकमेकांशी खूप जुळतात. ते सोबत नक्कीच शोभून दिसतात अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'सन ऑफ सरदार २'च्या स्क्रीनिंगला मृणाल धनुषच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलताना दिसली. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र पहिल्यांदा एकत्र दिसलेले नाहीत. याआधी धनुष, मृणाल, क्रिती सेनन आणि आणखी काही जणांचा सेल्फीही व्हायरल झाला होता. धनुष आणि क्रिती सेननच्या 'तेरे इश्क मे' सिनेमाच्या रॅप अप पार्टीत धनुषने मृणाल ठाकुरलाही बोलवलं होतं. हा तेव्हाचाच सेल्फी आहे. इथूनच दोघांच्या डेटिंगलाही सुरुवात झाली होती अशी चर्चा आता रंगली आहे.
धनुषने २००४ साली रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना लिंगा आणि यात्रा ही दोन मुलंही आहेत. २०२२ साली धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट जाहीर केला. आता दोन मुलांच्या वडिलांना मृणाल डेट करत असल्याने तिला ट्रोलही केलं जातंय. धनुष आणि मृणाल यांच्यात ९ वर्षांचं अंतर आहे.