"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:17 IST2025-01-30T14:17:32+5:302025-01-30T14:17:50+5:30

'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली.

Mns Chief Raj Thackeray Reaction On Chhava Movie Trailer Controversy Lezim Dance Scene | "इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन

"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन

Raj Thackeray on Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत 'छावा' (Chhaava) हा हिंदी चित्रपट चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना लेझिम खेळताना दाखवल्यानं सिनेमा वादात आला होता.  यावर 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर तो सीन वगळण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या वादानंतर आता पहिल्यांदा राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात संबोधित करताना राज ठाकरे यांनी छावा सिनेमा प्रत्येकाने बघायलाच हवा, असं आवाहन केलं आहे. भाषणाच्या सुरुवातीला छावा चित्रपटाबाबत ते म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण उतेकर (Chhaava Director Laxman Utekar ) यांनी भेट घेतली, ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. तसा मी काही या चित्रपटाचा वितरक नाही, पण, महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. तर संभाजी महाराज हे बलिदान आहेत".

 राज ठाकरे म्हणाले, "मी ट्रेलर पाहिला नव्हता. अमेय खोपकरं मला उतकेर भेटायला येत असल्याचं सांगितलं. सिनेमात संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवल्याचं सांगितलं. मग मी ट्रेलर पाहिला. दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आले, अर्थात लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. काय माहिती संभाजी राजेंनी कधीतरी लेझीम हातात घेतली असेल. इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तर असेल". 

पुढे ते म्हणाले, "पण मी त्यांना म्हटले की, या गाण्यावरुन चित्रपट पुढे सरकतोय की फक्त सेलिब्रेशन पुरते गाणे आहे. मग मी म्हटलं फक्त सेलिब्रेशन पुरते आहे. मग एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावत आहात? आपल्याकडे इतिहासकार सगळेच होऊ लागले आहेत, प्रत्येक गोष्टीत सर्वांच्या भावना दुखावतात.  औरंगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून जेव्हा लोक चित्रपट पाहायला जातील, तेव्हा महाराज लेझीम वैगरे खेळताना दिसतील. त्यापेक्षा ते काढून टाका. जसं महात्मा गांधींच्या आयुष्यावर चित्रपट काढला तर आपल्या डोळ्यासमोर त्यांची आंदोलन येतात. पण, चित्रपट पाहायला गेल्यावर महात्मा गांधी दांडीया खेळताना दाखवल्यावर कसं वाटेल आपल्याला". 

दरम्यान, 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने (Vicky Kaushal) साकारली आहे. मराठा महाराणी येसुबाई (Maratha Maharani Yesubai) यांच्या भूमिकेत मूळची दक्षिणेतली असलेली रश्मिका मंदाना आहे.  तर औरंगजेबाच्या भुमिकेत अक्षय खन्ना आहे. येत्या १४ फेब्रुवारीला तो प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा जगभर पोहोचणार आहे. 

 

 

Web Title: Mns Chief Raj Thackeray Reaction On Chhava Movie Trailer Controversy Lezim Dance Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.