महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:17 IST2025-08-04T11:04:12+5:302025-08-04T11:17:01+5:30
महाराष्ट्राचा जावई आहे हा अभिनेता! मिस्टर इंडियामधील 'या' नायकाला ओळखलं? केदार शिंदेंसोबत खास कनेक्शन

महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
Bollywood Actor: अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor)आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. १९८७ मध्ये आलेल्या चित्रपटात अनिल कपूर यांनी एका सामान्य माणसाची भूमिका साकारली होती. जो हातात घड्याळ घातल्यानंतर अदृश्य होतो. तर अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बो आणि श्रीदेवी यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. दरम्यान, या चित्रपटात हनुमानाची मूर्ती चोरणाऱ्यांना अनिल कपूर चांगलीच अद्दल घडवतो, असा सीन आहे. तो सीन पाहून अनेकांना हसू आवरणार नाही. दरम्यान, चित्रपटात ही भूमिका अभिनेते अजित वच्छानी यांनी साकारली आहे.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा स्टार शाहीर साबळे यांचा जावई आहे. अजित वच्छानी यांनी शाहीर साबळेंची मुलगी चारुशीला साबळेंसोबत लग्न केलं. चारुशीला साबळे वच्छानी या मराठी कलाविश्वातील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या. चारुशीला यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. गंमत जम्मत' मध्येच 'अश्विनी ये ना' हे गाणं होतं जे आजही लोकप्रिय आहे. चारुशीला साबळे केदार शिंदेंची सख्खी मावशी आहे.
अजित वच्छानींबद्दल जाणून घ्या...
अजित वच्छानी हे गुजराती रंगभूमीवरील मोठं नाव होतं. त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांच्या एकापेक्षा एक या मराठी चित्रपटातही ते झळकले. 'कयामत से कयामत तक', 'हम आपके है कौन' तसेच 'जोडी नंबर-१ 'यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. शिवाय गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांना भूमिका साकारल्या आहेत. मात्र,२५ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चारुशील आणि अजित यांना दोन मुली आहेत.