'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 17:16 IST2022-08-11T17:15:52+5:302022-08-11T17:16:53+5:30
Sonali kulkarni: दिल चाहता है या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने या अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण
बॉलिवूडमध्ये असे असंख्य चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्ष लोटली तरीदेखील त्यांची क्रेझ कमी झालेली नाही. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'दिल चाहता हैं'. आमिर खान (aamir khan), सैफ अली खान (saif ali khan) आणि अक्षय खन्ना (akshaye khanna) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. या चित्रपटामध्ये या दिग्गज कलाकारांसोबत मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री झळकली आहे हे फार मोजक्या जणांना माहित आहे. नुकतीच या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने या अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दिल चाहता है या चित्रपटात या तीन अभिनेत्यांसह प्रिती झिंटा (preity zinta) आणि डिंपल कपाडियादेखील (dimple kapadia) झळकली होती. विशेष म्हणजे या कलाकारांच्या मांदियाळीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचाही समावेश आहे. मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या सोनालीने या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यामुळेच चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण होताच तिने या सिनेमातील काही फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चित्रपटातील सगळे मुख्य कलाकार दिसून येत आहेत. यामध्ये “दिल चाहता है… कभी ना बिते चमकीले ये दिन”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.
दरम्यान, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आजही तरुणाईमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटात तीन जिवलग मित्र, त्यांची ताटातूट, तिघांच्या प्रेमकहाण्या, मित्रांच्यातील थट्टा मस्करी अत्यंत उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे. हा चित्रपट १० ऑगस्ट २००१ साली प्रदर्शित झाला होता.