ममता कुलकर्णीचा यू-टर्न, दाऊदची बाजू घेणं पडलं महागात, आता म्हणतेय - "मी विक्की गोस्वामीबद्दल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:35 IST2025-10-31T12:34:45+5:302025-10-31T12:35:28+5:30
Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतेच दाऊद इब्राहिमबद्दल केलेल्या विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यानंतर आता तिने यु-टर्न मारला आहे

ममता कुलकर्णीचा यू-टर्न, दाऊदची बाजू घेणं पडलं महागात, आता म्हणतेय - "मी विक्की गोस्वामीबद्दल..."
अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतेच दाऊद इब्राहिमबद्दल केलेल्या विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. तिने दाऊद हा न कोणताही दहशतवादी आहे आणि न बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही घटनेत त्याचे नाव कधी आले आहे, असे म्हटले होते. तिच्या या विधानानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आता तिने यु-टर्न मारला आहे आणि तिने ती दाऊद इब्राहिमबद्दल नाही तर विक्की गोस्वामीबद्दल बोलत असल्याचं म्हटलं.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली, ''काल माझ्या शब्दांचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झाले. मला सर्वात आधी प्रश्न विचारण्यात आला की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी नाव जोडले गेले आहे का. तर, मी म्हटले की हे चुकीचे आहे, माझे कधीही दाऊद इब्राहिमशी भेटणे झाले नाही आणि मी त्याला ओळखतही नाही.''
''विक्कीने कधीही देशविरोधी काम केले नाही''
ती पुढे म्हणाली की, ''तर, हा प्रश्न मला विचारलाच जाऊ नये. यानंतर मी पुढे म्हटले की ज्याच्याशी माझे नाव कधी जोडले गेले होते, विक्की गोस्वामी, त्याच्याशीही मी संबंध तोडला आहे. त्यानेही कधी देशविरोधी काम केले नाही. तुम्ही कधी ऐकले आहे की विक्की गोस्वामीने कोणताही ब्लास्ट केला? माझा कोणत्याही देशविरोधी व्यक्तीशी संपर्क नाही. मी कट्टर हिंदूवादी आहे, म्हणूनच मी भगवा धारण केला आहे. जर मी हे धारण केले आहे, तर आपणच मला शक्ती दिली पाहिजे.''
''दाऊद इब्राहिम माझ्यासाठी एक दहशतवादी आहे''
''दाऊद इब्राहिम माझ्यासाठी एक दहशतवादी आहे, त्याच्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. विक्की गोस्वामीचा त्याच्याशी काय संबंध आहे, मला काहीच माहिती नाही. मला आता अंडरवर्ल्ड ॲक्टिव्हिटीजबद्दल काहीही बोलायचे नाही.'' ती बोलली, ''मी २५ वर्षे ध्यान आणि तप केले आहे, आता याची कोणाला थट्टा करायची असेल तर करू द्या. माझ्याकडे ज्ञान आहे आणि विद्या आहे, मला महाकालीचा आशीर्वाद प्राप्त आहे. यातून मी सनातन धर्मात अधिक अग्रेसर राहीन. पुढे जाऊन याचा प्रचार करेन.''
२ हजार कोटींची ड्रग्स तस्करी
ममता कुलकर्णीचे नाव विक्की गोस्वामीशी जोडले गेले होते, ज्याच्यावर २,००० कोटी रुपयांच्या ड्रग्स तस्करीचा आरोप होता. या प्रकरणात तिचे नाव देखील आले होते, परंतु नंतर तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
 
